अ‍ॅपशहर

५० कोटी युजर्सची माहिती चोरी

सन २०१४मध्ये आपल्या सुमारे ५० कोटी युजर्सची माहिती चोरण्यात आल्याची माहिती याहू कंपनीने दिली आहे. जगातील या सर्वांत मोठ्या सायबर चोरीमागे एखाद्या देशाचा हात असल्याचा आरोपदेखील याहूने केला आहे.

Maharashtra Times 24 Sep 2016, 2:47 am
वॉशिंग्टन : सन २०१४मध्ये आपल्या सुमारे ५० कोटी युजर्सची माहिती चोरण्यात आल्याची माहिती याहू कंपनीने दिली आहे. जगातील या सर्वांत मोठ्या सायबर चोरीमागे एखाद्या देशाचा हात असल्याचा आरोपदेखील याहूने केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम yahoo state hackers stole data from 500 million users
५० कोटी युजर्सची माहिती चोरी


सन २०१४च्या अखेरीस सुमारे ५० कोटी युजर्सची माहिती हॅकिंगद्वारे चोरण्यात आल्याचे याहूने केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे. चोरण्यात आलेल्या माहितीमध्ये युजर्सची नावे, ई-मेल पत्ता, टेलिफोन क्रमांक, जन्मतारीख, पासवर्ड तसेच सुरक्षा प्रश्नोत्तरांचा समावेश असल्याचे याहूने जाहीर केले आहे. सुदैवाने असुरक्षित पासवर्ड, पेमेंट कार्ड डेटा, बँक खात्याची माहिती कंपनीच्या सिस्टीममध्ये जपून ठेवली जात नसल्याने अशा माहितीची चोरी होऊ शकली नसल्याचे याहूने म्हटले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज