इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी अध्यक्ष असिफ अली झरदारी व त्यांची बहिण फरयाल तलपुर यांचा समावेश एक्सिट कंट्रोल लिस्ट (देशाबाहेर जाण्यास मनाई)मध्ये करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने बुधवारी दिली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. झरदारी आणि तलपुर यांच्यावर ३५ अब्ज रुपयांच्या मनी लाँडरिंगचा गुन्हा आहे. अनेक बँकामधून आणि बनावट खात्यांमधून हा पैसा वळविण्यात आला असून,तो लाच आणि दलालीच्या स्वरूपात मिळाला असल्याचा आरोप आहे.
झरदारींना देश सोडण्यावर बंदी
पाकिस्तानचे माजी अध्यक्ष असिफ अली झरदारी व त्यांची बहिण फरयाल तलपुर यांचा समावेश एक्सिट कंट्रोल लिस्ट (देशाबाहेर जाण्यास मनाई)मध्ये करण्यात आल्याची ...
Maharashtra Times 12 Jul 2018, 4:00 am