अ‍ॅपशहर

उद्धवजी गुवाहाटीला या, जोरदार स्वागत करतो, आसामच्या मुख्यमंत्र्यांकडून भेटीचं निमंत्रण

पर्यटनाला चालना देण्यासाठी आम्ही खूप पैसा खर्च केला आहे. आम्ही म्हणतो कामख्याला या, काझीरंगाला या. आता त्या लोकांना आसाममध्ये येण्यापासून रोखायचे का? आसाममध्ये शिवसेनेच्या आमदारांना 'ओलिस' ठेवले जात आहे का, असे विचारले असता सरमा म्हणाले की, हे कसले ओलीस? ते हॉटेलमध्ये आहेत. ते आनंदी आहेत. ते आमचे पाहुणे आहेत. साधारणपणे आपण पाहतो की जो कोणी आसाममध्ये येत आहे त्याला आरामदायक वाटले पाहिजे, असं आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटलं.

Authored byअक्षय आढाव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jun 2022, 9:22 pm
नवी दिल्ली : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गुवाहाटी भेटीचं निमंत्रण दिलंय. उद्धव ठाकरे यांनी आपली सुट्टी साजरी करण्यासाठी आसाममध्ये आले तर त्यांचं स्वागत करु तसेच जितके दिवस आमदार गुवाहाटीमध्ये राहतील त्यांचं स्वागत करु, असंही हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम himanta biswa sarma and uddhav thackeray
हिमंता बिस्वा सरमा आणि उद्धव ठाकरे


गेले ४ दिवस एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले बंडखोर आमदार गुवाहाटीमधील रेडिसन्स ब्ल्यू इथे मुक्कामी आहेत. वरचेवर महाराष्ट्रातून शिवसेनेचे काही आमदार शिंदे गटात दाखल होतायेत. शिंदे गटात आता आमदारांची संख्या जवळपास ४० च्या वर झाली आहे. केवळ महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष गुवाहाटीकडे लागलं आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना भाजप पदाधिकारी मदत करत असल्याचा दावा अनेक जण करतायेत. याच पार्श्वभूमीवर आसामच्या मुख्यमंत्र्यांना शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबाबत प्रश्न विचारला गेला. त्यावर त्यांचं आम्ही स्वागत करतोय, असं ते म्हणाले.

'मी गुवाहाटीची हॉटेल्स बंद करावीत का?'

भाजपच्या नेतृत्वाखालील आसाम सरकार पूर मदत कार्याकडे कथितपणे दुर्लक्ष करत आहे आणि महाराष्ट्रातील आमदारांचे स्वागत करण्यात व्यस्त आहे, या आरोपांवर मुख्यमंत्री सरमा म्हणाले, राज्यात पूरस्थिती असल्याने हॉटेल्स बंद करण्याचे आदेश देऊ शकत नाही. लोकांची मानसिकता काय आहे हे मला माहीत नाही. राज्याच्या काही भागात पूर आल्याने मी गुवाहाटीतील हॉटेल्स बंद करावीत का? आम्ही पूरग्रस्तांना मदत करत आहोत. मी गुवाहाटी हॉटेल्स कशी बंद करू शकतो. उद्या जर तुम्ही गुवाहाटीत येऊन 10 दिवस राहायचे ठरवले तर तुम्ही येऊ नका असे मी मुख्यमंत्री म्हणून सांगायचे का?

शिवसेना आमदार हॉटेलमध्ये खूश : सरमा

सरमा म्हणाले की, पर्यटनाला चालना देण्यासाठी आम्ही खूप पैसा खर्च केला आहे. आम्ही म्हणतो कामख्याला या, काझीरंगाला या. आता त्या लोकांना आसाममध्ये येण्यापासून रोखायचे का? आसाममध्ये शिवसेनेच्या आमदारांना 'ओलिस' ठेवले जात आहे का, असे विचारले असता सरमा म्हणाले की, हे कसले ओलीस? ते हॉटेलमध्ये आहेत. ते आनंदी आहेत. ते आमचे पाहुणे आहेत. साधारणपणे आपण पाहतो की जो कोणी आसाममध्ये येत आहे त्याला आरामदायक वाटले पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी आपली सुट्टी साजरी करण्यासाठी आसाममध्ये आले तर त्यांचं स्वागत करु तसेच जितके दिवस आमदार गुवाहाटीमध्ये राहतील त्यांचं स्वागत करु.
लेखकाबद्दल
अक्षय आढाव
अक्षय आढाव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | याआधी टीव्ही ९ मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ५ वर्षांचा अनुभव | राजकीय, सामाजिक आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची विशेष आवड.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज