अ‍ॅपशहर

Breaking : मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड दहशतवादी अबू बकरला अटक

लवकरच त्याला देशात आणण्यात येणार आहे. मुंबईत १२ ठिकाणी झालेल्या या बॉम्बस्फोटामध्ये २५७ नागरिकांचा बळी गेला होता. याशिवाय ७१३ जण जखमी झाले होते.

महाराष्ट्र टाइम्स 5 Feb 2022, 7:09 am
नवी दिल्ली : भारतीय तपास यंत्रणांनी १९९३च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आणि प्रमुख दहशतवादी अबू बकरला संयुक्त अरब अमिरातीत ताब्यात घेतले असून, लवकरच त्याला देशात आणण्यात येणार आहे. मुंबईत १२ ठिकाणी झालेल्या या बॉम्बस्फोटामध्ये २५७ नागरिकांचा बळी गेला होता. याशिवाय ७१३ जण जखमी झाले होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai bomb blast 1993 date


तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार अबू बकरने पाकिस्तानमध्ये शस्त्रास्त्र आणि बॉम्बच्या निर्मितीचे प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर त्याने मुंबईतील स्फोटांमध्ये वापरलेले 'आरडीक्स' पेरण्याचे काम केले होते. मुंबई बॉम्बस्फोटाची योजना दुबईतील दाऊद इब्राहिमच्या घरी रचल्याचेही तपासात उघड झाले होते.

Asaduddin Owaisi: कदाचित मी उद्याचा दिवस पाहू शकणार नाही, मला बोलू द्या!; ओवेसींनी व्यक्त केली ही भीती
गेली २९ वर्षे अबू बकर भारतीय तपास यंत्रणांना गुंगारा देऊन संयुक्त अरब अमिरात आणि पाकिस्तानात राहात असल्याचेही समोर आले होते. बकरला २०१९मध्ये अटक करण्यात आली होती. मात्र, त्याने सादर केलेल्या दस्तावेजांमुळे संयुक्त अरब अमिरातच्या अधिकाऱ्यांनी मुक्तता केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बकरच्या प्रत्यार्पणासाठी भारतीय तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत.

महत्वाचे लेख