न्यू यॉर्कच्या रॅम्पवर भारतीय संस्कृती
पुणे टाइम्स टीम
जगभरातल्या फॅशनच्या ट्रेंडचं सादरीकरण होणाऱ्या तसंच जागतिक फॅशनप्रेमींकडून दखल घेतल्या जाणाऱ्या ‘न्यू यॉर्क फॅशन वीक’मध्ये भारतीय संस्कृती, परंपराही रॅम्पवर दिसणार आहे. या शोमध्ये भारताचं प्रतिनिधित्त्व करण्याचं काम पुण्याची ‘चासा इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन अँड टेक्नॉलॉजी’ ही संस्था करणार आहे. ८ सप्टेंबरला मॅनहॅटन, न्यूयॉर्क इथं हा फॅशन वीक होत आहे.
‘पंतप्रधानांच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या उपक्रमातर्गंत संस्थेच्या चंद्रकला सानप आणि अनुपम गोयल यांनी ‘मुलींना शिकवा’ ही संकल्पना घेऊन या शोसाठी कपडे डिझाइन केले आहेत. न्यू यॉर्क फॅशन वीकमध्ये भारतीय बाणा आणि संस्कृती यावर भाष्य करणारा हा वस्त्रप्रावरणांचा संग्रह प्रेरणास्थान ठरेल, असं सानप यांनी सांगितलं. नृत्य दिग्दर्शक लुबना अॅडम्स यांनी हा शो कोरिओग्राफ केला आहे.
.......