अ‍ॅपशहर

मिस युनिव्हर्सचा किताब जिंकल्यावर हरनाजला दर महिन्याला मिळणार एवढे पैसे, राहण्यासाठी दिलं जाणार हे घर

हरनाज संधूला केवळ मिस युनिव्हर्सचा किताबच मिळाला नाहीय तर यासह तिला कित्येक लग्जरी वस्तूही मिळाल्या आहेत. विजेतेपद पटकावल्यानंतर मिस युनिव्हर्स २०२१ ला मीडिया कव्हरेज मिळण्यासोबतच तिच्या बँक खात्यात एक महत्त्वपूर्ण रक्कम देखील दिली जाते, जी हरनाजलाही देण्यात येईल.

Curated byTanaya | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Dec 2021, 10:56 am
भारताला तब्बल २१ वर्षांनंतर मिस युनिव्हर्सचा किताब पुन्हा मिळाला आहे. चंदीगडमधील २१ वर्षीय हरनाज संधूने ही स्पर्धा जिंकल्यानं संपूर्ण देशवासियांना याचा अभिमान वाटत आहे. तिच्यावर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सुष्मिता सेन आणि लारा दत्ता यांनीही हरनाजला शुभेच्छा दिऊन तिच्यासाठी सोशल मीडियावर एक खास पोस्टही शेअर केलीय. यामुळे एकीकडे हरनाजबद्दल इंटरनेटवर माहिती शोधण्याचंही प्रमाण वाढलंय, तर दुसरीकडे लोकांमध्ये याबाबतही उत्सुकता आहे की मिस युनिव्हर्स स्पर्धेची विजेती हरनाज व उपविजेत्यांना नेमके काय-काय मिळणार आहे?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम after winning miss universe pageant harnaaz sandhu will get these luxury facilities
मिस युनिव्हर्सचा किताब जिंकल्यावर हरनाजला दर महिन्याला मिळणार एवढे पैसे, राहण्यासाठी दिलं जाणार हे घर

छोटासा ड्रेस घालून दिशा परमारने दाखवला ग्लॅमरस जलवा, पत्नीचा असा लुक पाहून राहुलही झाला फिदा

एकीकडे विजेतेपदाचा मुकुट डोक्यावर चढवून सन्मान केला जातो, तर दुसरीकडे अशा अनेक जबाबदाऱ्याही मिळतात, ज्या त्यांना पार पाडाव्या लागतात. त्यांच्यासाठी काही खास प्रोटोकॉल्स ठेवले जातात, तर यासह त्यांना अशा अनेक सोयीसुविधाही उपलब्ध करून दिल्या जातात, ज्याद्वारे त्यांना रॉयल ट्रीटमेंट मिळते. इतकेच नव्हे तर त्यांना दर महिन्याला एखाद्या कर्मचार्‍याप्रमाणे वेतन दिले जाते. या सर्व गोष्टींबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती…(सर्व फोटो: इंस्टाग्राम@ harnaazsandhu_03)
वेडिंग लुकचा ट्रेंड जोमात! पेट फॅशनमध्ये काय नवनवीन पाहायला मिळतंय? वाचा

​हरनाजच्या डोक्यावर आहे आतापर्यंतचे सर्वात महागडे मुकुट

हरनाजनं मिस युनिव्हर्स किताब जिंकल्यानंतर तिला मिळणाऱ्या सोयी-सुविधांबद्दल माहिती जाणून घेण्यापूर्वी तिच्या क्राउनबद्दल चर्चा करूया. याची किंमत जाणून घेतल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल. हरनाजला Mouawad चे Power of Unity Crown घालण्यात आलाय. या क्राउनचे वजन जवळपास एक किलो आणि किंमत तब्बल ३७ कोटी रूपये असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मुकुटामध्ये १ हजार ७२५ हिऱ्यांचा समावेश करण्यात आलाय. यापूर्वी हा क्राउन मिस युनिव्हर्स २०१९ आणि २०२० च्या विजेत्यांनाही घालण्यात आला होता.

(२१ वर्षांच्या हरनाज संधूनं जिंकली Miss Universe २०२१ स्पर्धा, २१ वर्षांनंतर भारतानं मिळवला हा मान)

​येथे राहण्याची मिळणार संधी

हरनाजला पुढील एक वर्ष आलिशान पेंटहाऊसमध्ये राहण्याची संधी मिळणार आहे. जे तिच्यासाठी पूर्णपणे मोफत असेल. हे पेंटहाऊस न्यूयॉर्कमध्ये आहे. मिस अमेरिकासोबत ही जागा तिला शेअर करायची आहे. तिच्यासाठी सर्व व्यवस्था केली जाणार आहे. यामध्ये घरातील किराणा सामानापासून ते प्रवासाच्या सुविधांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे.

(Miss Universe 2021ची विजेती हरनाज संधूला विचारला हा प्रश्न, ज्याचे उत्तर देणे नव्हते सोपे)

जगभ्रमंती करण्याची संधी

मिस युनिव्हर्स स्पर्धेचं विजेतेपद पटकावल्यानंतर हरनाज संधू मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनची मुख्य ब्रँड अ‍ॅम्बेसेडरही बनली आहे. यामुळे तिला पुढील वर्षभर जगभरात होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये संस्थेतर्फे सहभाग नोंदवण्याची संधी मिळणार आहे. जगभर प्रवास करताना, मेकअपपासून ते इतर गोष्टींपर्यंत सर्व गोष्टींसाठी तिच्यासोबत तज्ज्ञांची एक टीम असेल, जी तिच्या लुकची काळजी घेईल. तिच्यासाठी हा प्रवासही पूर्णपणे मोफत असेल.

(बोल्ड डिझाइनर ड्रेस घालून शिल्पा शेट्टीनं हॉट लुकने केले घायाळ, चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव)

इतके वेतन मिळणार?

मिस युनिव्हर्सला दर महिन्याला चांगला पगारही मिळतो. ही रक्कम कधीच उघड केली जात नाही. मात्र इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार हरनाजला दर महिन्याला सहा आकडी पगार मिळेल, अशी माहिती आहे. यासोबतच ती जिथे जाईल तिथे तिला उत्तम कव्हरेज देण्यासाठी सुप्रसिद्ध फोटोग्राफर आणि मीडियाकर्मी असतील.

(सारानं कागदासारखा हलक्या फॅब्रिकचा ड्रेस घालून अक्षय कुमारसह घेतली एंट्री, अभिनेत्रीचा किलर लुक Viral)

(NOTE : ही सर्व माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारित आहे.)

लेखकाबद्दल
Tanaya

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज