अ‍ॅपशहर

बाल्ड इज बोल्ड

सध्या अनेक कारणांमुळे मुलांमध्ये टक्कल लवकर पडण्याचं प्रमाण वाढतंय. मात्र, याचा अजिबात संकोच न बाळगता हा बाल्ड लूक फॅशननं मिरवला पाहिजे.

Maharashtra Times 1 Dec 2016, 3:00 am
सध्याच्या पिढीत ताणतणावाची वाढती पातळी पाहाता; तसंच बदलत्या जीवनशैलीचा परिणाम म्हणून अनेक मुलांना/पुरुषांना अकाली टक्कल पडतं. याबाबत न्यूनगंड न बाळगता हाच ‘बाल्ड लूक’ फॅशन म्हणून मिरवला तर? विचित्र वाटतंय ना ऐकायला? मात्र, हे खरं आहे. सध्या बाल्ड लूक मिरवण्याची फॅशन असून, त्यासाठी काहीजण चक्क सलूनमध्ये जात आहेत. ज्या हॉलिवूड सेलिब्रेटींनी हा लूक ठेवलाय, त्यांना अनेकजण फॉलोही करत असल्याचं चित्र आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bald look
बाल्ड इज बोल्ड

केस म्हणजे आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग. मात्र, सध्या अनेक कारणांमुळे मुलांमध्ये टक्कल लवकर पडण्याचं प्रमाण वाढतंय. अनेक मुलं लूकमध्ये बदल म्हणून काही काळासाठी झिरो मशीन फिरवून घेतात किंवा चकचकीत गोटाही करून घेतात. काही मुलीही असा लूक बिनधास्त मिरवतात. मेट्रो सिटी आणि चारचौघांपेक्षा हटक्या क्षेत्रात करिअर करणाऱ्या मुली असा निर्णय बेधडक घेताना दिसतात. ड्वायने जॉन्सन, पिटबुल, विन डिझेल यांसारख्या सेलेब्जनंही आपला बाल्ड लूक कमालीचा मिरवलाय. ज्यांनी बाल्ड लूक सांभाळला आहे, ते वेगवेगळ्या पद्धतीची दाढी ठेवू शकतात. यामुळे स्टाइल स्टेटमेंट आणखी वाढेल. त्यामु‍ळे टक्कल पडल्यास अजिबात संकोच वाटू देऊ नका. हा लूक फॅशनेबली मिरवा. काही वैद्यकीय कारणामुळे टक्कल पडलेलं असो किंवा फॅशनच्या हट्टापोटी असो हा बाल्ड लूक सांभाळण्यासाठी खाली दिलेल्या टिप्स नक्कीच कामी येतील.
नियमित शॅम्पू करा ः खरंतर हे वाचायला विचित्र किंवा चुकीचं वाटेल; पण शॅम्पू करणं ही पहिली आणि सर्वांत महत्त्वाची टिप आहे. त्यामुळे डोक्यावर केस नाहीत, तर कशाला करायचा शॅम्पू असा विचार मनात आणू नका. यामुळे टाळूवरची घाण आणि तेल निघून जातं. परिणामी, टाळू निरोगी, स्वच्छ राहातो. तुम्ही शॅम्पू करताना मसाज केलं, तर टाळूला होणारं रक्ताभिसरण वाढतं. शॅम्पू केल्यानं टक्कल चकचकीतही दिसतं. त्यामुळे शॅम्पू महत्त्वाचा आहेच.
शेव्ह करा ः बाल्ड लूक शेव्हिंग केल्यानं आणखी चांगला दिसतो. त्यामुळे तुमच्या केसांची वाढ पाहून त्यानुसार शेव्हिंग करा. अंघोळ केल्यानंतर शेव्ह केलेलं कधीही चांगलं; कारण शाम्पू केल्यानंतर टाळूची त्वचा मऊ झालेली असते.
मॉइश्च्युरायझर ः शेव्ह केल्यानंतर मॉइश्च्युरायझर लावणं ही पुढची पायरी आहे. नियमित शेव्ह केल्यानं तुमचा टाळू कोरडा पडू शकतो, त्यामुळे चांगल्या प्रतीचं मॉइश्च्युरायझर लावलं पाहिजे. यामुळे टाळूला तकाकी येतेच; शिवाय तो निरोगीही राहातो.
दुर्गंधीनाशक लोशन वापरा ः केस असतील, तर डोक्यात येणारा घाम हा कपाळावर दिसून येतो. तेच केस नसताना थेट टाळूवर घाम जमा होतो. त्यात तुम्हाला घाम येण्याचं प्रमाण जास्त असेल, तर एखादं दुर्गंधीनाशक लोशन वापरलंच पाहिजे. यामुळे घाम साचण्याचं प्रमाणही कमी होतं. रोज रात्री झोपताना हे लोशन लावावं; तसंच सोबत काही सोप टिश्यू बाळगायलाही हरकत नाही.
सनस्क्रीनही हवंच ः प्रखर उन्हात तुम्ही हात-पाय आणि चेहऱ्याला सनस्क्रीन लोशन लावूनच बाहेर पडत असाल. मात्र, ज्यांनी बाल्ड लूक ठेवलाय त्यांनीही टाळूला सनस्क्रीन लावलं पाहिजे. यामुळे टॅनिंग होणार नाही; तसंच नियमित टोपीही वापरा.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज