रविवारी म्हणजे १५ ऑगस्टलाही मलायका अरोरा आणि अरबाज खान आपल्या मुलासाठी भेटले होते. दरम्यान या दोघांचीही भेट खूप चर्चेत होतीच पण त्याहूनही जास्त मलायकाचा हॉट लुक चर्चेत होता. मलायकाने आपल्या हॉट लुकनं चाहत्यांना पुन्हा घायाळ केल्याचं पाहायला मिळालं. (फोटो सौजन्य - योगेन शाह)
(जान्हवी कपूरचा हॉट लुक खुशीच्या साध्या अवतारावर पडला भारी, फोटो तुफान व्हायरल)
अरबाज नव्हे तर अमृता-आई सुद्धा होती सोबत
मलायका अरोरा रविवारी वांद्रे परिसरातील ऑलिव्ह रेस्टॉरंटमध्ये पोहोचली होती. यावेळेस तिच्यासोबत अरबाज खानव्यतिरिक्त अभिनेत्रीची आई आणि बहीण अमृता अरोरा देखील होती. यादरम्यान रेस्ट्रॉरंटमधून बाहेर पडल्यानंतर अरबाज खान काही अंतर दूर जाऊन उभा राहिला होता. त्यावेळेस मलायकाच्या आईने अरबाजला हाक मारून मागे बोलावलं आणि मायेनं त्याच्या कपाळाचं चुंबन घेतले. हे पाहून लोक फार आश्चर्यचकित झाले. दरम्यान अरबाजच्या मागे अमृता आणि मलायका देखील दिसत आहेत, नेहमीप्रमाणे यावेळेसही दोघींचा सुंदर लुक चाहत्यांना पाहायला मिळाला.
(दिरासह पार्टी करण्यासाठी निघालेल्या मीरा राजपूतने घातला बोल्ड ड्रेस, हॉट लुक व्हायरल)
मलायकाचा शॉर्ट स्कर्ट लुक
अरबाज खानसह लंच डेटवर निघालेल्या मलायका अरोरानं खूप सेक्सी लुकची निवड केली होती. तिनं आपली फिट फिगर फ्लाँट करण्याची एकही संधी सोडली नाही. मलायकानं पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट आणि त्यावर फिटेड स्कर्ट मॅच केले होते. मलायकानं Gucci ब्रँडचे टी-शर्ट घातले होते, ज्यावर लाल व निळ्या रंगाचे प्रिंट आपण पाहू शकता. टी-शर्टमध्ये राउंड नेकलाइनसह हाफ स्लीव्ह्ज डिझाइनचा समावेश होता. स्कर्टमधील स्लिट डिझाइनमुळे मलायकाला हॉट लुक मिळाला आहे.
मलायकावरून नजर दुसरीकडे वळणारच नाही
क्लासिक कलर-कॉम्बिनेशन असणाऱ्या या आउटफिटमध्ये मलायका अरोरा खूप सुंदर दिसत होता. तिनं आपली टोंड फिगर फ्लाँट करण्याची एकही संधी सोडली नाही. मलायकाने अशा कपड्यांची निवड केली होती ज्यामुळे तिला स्टायलिश व फॅशनेबल लुक मिळालाय. विशेष म्हणजे तिनं कमीत कमी मेकअप करण्यावर भर दिल्याचे दिसत आहे. यासह ड्रेसवर तिनं स्नेक प्रिंट लाल रंगाचे फुटवेअर मॅच केले आहेत.
(प्रीति झिंटाच्या लग्नात नटून-थटून पोहोचली माधुरी दीक्षित, नववधूऐवजी ‘मोहिनी’वर खिळली सर्वांची नजर)
अमृताचा लुक होता कमाल
मलायकाची बहीण अमृताचाही लुक ग्लॅमरस, सेक्सी आणि मॉडर्न होता. अमृताने फ्लोरल पॅटर्न मॅक्सी ड्रेस परिधान केला होता, ज्यामध्ये ऑफ शोल्डर लुकमध्ये स्ट्रॅप्स स्लीव्ह्ज आपण पाहू शकता. आउटफिटमध्ये डीप नेकलाइनसह मागील बाजूसही मॅचिंग डिटेलिंग जोडण्यात आले होते. या अँकललेंथ ड्रेसमध्ये अमृताचा लुक खूप स्टायलिश व कम्फर्टेबल दिसत होता.
अमृताचा ट्रेंडी लुक
अमृतानं काळ्या रंगाचा स्टायलिश व ग्लॅमरस ड्रेस परिधान केला होता. ड्रेसमध्ये हॉरिजॉन्टल पॅटर्नमध्ये स्टीचिंग करण्यात आले होते, ज्यामुळे फ्लेअर्ड आणि फ्लाउंस लुक मिळाला आहे. मलायकाप्रमाणेच अमृतानंही कमीत कमी मेकअप करण्यावर भर दिला होता. तर अभिनेत्रीच्या आईनं कटआउट स्लीव्ह्ज ब्लाउजसह कॉटन फॅब्रिकची साडी नेसली होती. त्यांचाही लुकही नेहमीप्रमाणे सुंदरच दिसत होता.
(आजोबांच्या लंच पार्टीत वडिलांसह पोहोचला जेह अली खान, तर करीनाने स्टायलिश लुकने वेधलं सर्वांचं लक्ष)