(यामी गौतमनं लाल रंगाचा लेहंगा घालून केलं शानदार फोटोशूट, लुक पाहून म्हणाल 'सुंदरा मनामध्ये भरली')
तिची बहीण अमृता अरोरा (Amrita Arora) देखील ग्लॅम लुकमुळे भलतीच चर्चेत असते. सोशल मीडियावरही तिचे बोल्ड लुकमधील कित्येक फोटो पाहायला मिळतील. याचीच झलक शाहरुख खानने आयोजित केलेल्या पार्टीतही दिसली होती. (फोटो सौजन्य-अमृता अरोरा इंस्टाग्राम/ इंडियाटाइम्स)
(करिश्मा कपूरच्या सौंदर्यासमोर बेबोचा हॉट लुकही पडला फिका, स्लिट ड्रेसमधील बोल्ड लुक पाहून चाहते घायाळ)
लुक पाहून व्हाल घायाळ
अमृता अरोरानं २०१८मध्ये शाहरुख खान आणि गौरी खाननं आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीमध्ये हजेरी लावली होती. तिच्या हटके लुकमुळे पार्टीमध्ये तीच सर्वाधिक चर्चेत होती. अमृताने मोनोक्रोमॅटिक पॅटर्नच्या प्रिंटेड साडीची निवड केली होती, जी दिसायला साधी, मोहक व बोल्डही होती. साडीवर परिधान केलेल्या बोल्ड डिझाइनर ब्लाउजमुळे तिला सेक्सी लुक मिळाला. एकंदर तिनं या पॅटर्नची साडी नेसून आपली टोंड फिगर फ्लाँट करण्याची एकही संधी सोडली नाही.
(जान्हवी कपूरनं घातला बोल्ड डिझाइनर ड्रेस, हॉट अवतारासमोर लहान बहिणीचा लुक पडला फिका)
अशी नेसली साडी
अमृता अरोरानं प्रसिद्ध फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्राच्या लेटेस्ट कलेक्शनमधून या कस्टम हँडमेड मोनोटोन सीक्वेंस साडीची निवड केली होती. साडीवर तिनं कटआउट स्लीव्ह्ज ब्लाउज मॅच केले होते. या पारंपरिक पेहरावामध्ये तिनं मॉडर्न टचही दिलाय. जॉर्जेट फॅब्रिकपासून ही साडी तयार करण्यात आली आहे. ज्यावर चंदेरी रंगाच्या धाग्यापासून सुंदर एम्ब्रॉयडरी वर्क करण्यात आले होते.
स्टायलिश ब्लाउज
अमृताने नेसलेली साडी पूर्णतः प्लेन पॅटर्नमधील होती, तर दुसरीकडे तिनं परिधान केलेले ब्लाउज स्टायलिश व बोल्ड डिझाइनचे होते. अमृतानं साडीवर चंदेरी रंगाचा शिमरी पॅटर्नमधील ब्लाउज घातला होता, याचं डिझाइन ऑफ शोल्डर पॅटर्नमधील होते. हटके लुक मिळावा म्हणून तिनं साडीवर कोणत्याही प्रकारचे दागिने घातले नव्हते. अभिनेत्रीनं केवळ डायमंड-डिटेल्ड ईअररिंग्स मॅच केले. ज्यामुळे तिच्या लुकला हॉट टच मिळाला.
(मलायका अरोराचे बोल्ड डिझाइनर गाउनमधील हॉट फोटोशूट VIRAL, स्लिट ड्रेसमधील मादक अवतार)
परफेक्ट लुक
आपला लुक स्टायलिश व क्लासिक दिसावा याकरीता अमृतानं मेकअपवर विशेष लक्ष दिलं होतं. डेवी मेकअप, सेमी-स्मूद लायनरसह तिनं स्मोकी आईज, न्यूड लिपस्टिक, बीमिंग हाइलाइटर अशा ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर केला होता. साइड पार्टेड हेअरस्टाइलमुळे तिला शानदार लुक मिळाला आहे.