अ‍ॅपशहर

गोडापासून दागिन्यांपर्यंत…खूप काही

रक्षाबंधनला भावाला किंवा बहिणीला काय गिफ्ट द्यायचं याचं प्लॅनिंग आधीपासून सुरू झालेलं असतं. यंदा या सणानिमित्त मार्केटमध्ये काय नवीन आलं आहे त्यावर टाकलेली एक नजर…

Maharashtra Times 17 Aug 2016, 2:55 am
प्राची आंधळकर,कॉलेज क्लब रिपोर्टर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gifts for rakshabandhan
गोडापासून दागिन्यांपर्यंत…खूप काही


रक्षाबंधनला भावाला किंवा बहिणीला काय गिफ्ट द्यायचं याचं प्लॅनिंग आधीपासून सुरू झालेलं असतं. यंदा या सणानिमित्त मार्केटमध्ये काय नवीन आलं आहे त्यावर टाकलेली एक नजर…

पुस्तक, बुकमार्क – वाचनाची आवड असलेल्या भावाला किंवा बहिणीला आवडत्या लेखकाचं पुस्तक देता येईलच. पण त्या पुस्तकाबरोबरच सुंदर असे बुकमार्क्सही देऊ शकता. बुकमार्कमध्ये सध्या खूप छान डिझाइन्स मिळतात. कार्टून्स कॉर्नर मार्क, बुक पिनही छान डिझाइन्समध्ये आले आहेत.

व्हॅनिटी किट - दररोजच्या वापरासाठी लागणारी सौंदर्य प्रसाधनं ठेवण्यासाठी एक हटके व्हॅनिटी किट पाऊच तुम्ही देऊ शकता. सॅनिटायझर, वेट टिश्यू, फेस वॉश, ड्राय क्रीम, लोशन, काजळ, लिपस्टिक, फेस पावडर, लीप बाम यासारख्या नेहमीच्या वापरातील वस्तू या रक्षाबंधनला बहिणीला देऊ शकता. ब्युटी किट आणि हटके व्हॅनिटी किट खूप उपयुक्त ठरेल.

अँटिक बॉक्स, ज्वेलरी - कॉकटेल ज्वेलरी, अँटिक ज्वेलरीमधल्या वेगवेगळ्या व्हरायटी सध्या मार्केटमध्ये आल्या आहेत. त्यामधले नेकपीस, कानातले, प्लम कफ, बॉडी ज्वेलरी यासारखे वेगवेगळे हटके दागिने या निमित्तानं तुम्ही गिफ्ट करू शकता. ही ज्वेलरी ठेवण्यासाठी लाकडाचे भन्नाट अँटिक बॉक्सही बाजारात आले आहेत. घड्याळ, महत्वाच्या गोष्टी, ज्वेलरी अशा सगळ्या गोष्टी या बॉक्समध्ये ठेवता येतात.

कपकेक, चॉकलेट्स - वेगवगेळ्या मिठायांबरोबरच चॉकलेट्स आणि कपकेक्सना मागणी आहे. स्पेशल कॅप्शन्सवाले कपकेक विकत घेतले जात आहेत. रेड वेल्वेट, त्रीमांशू, चॉकलेट, फ्रुट स्पेशल, ड्रायफ्रूट स्पेशल अशा वेगवेगळ्या फ्लेवर्समधले कपकेक देऊ शकता.

हेडफोन्स - गाणी ऐकण्याची आवड असेल तर मार्केटमध्ये वेगवेगळ्या डिझाइन्सचे इअरफोन्स, हेडफोन्स आले आहेत. मिनिअन्स, पोकेमॉन, सुपरमॅन, बॅटमॅन यासारखे सुपर कार्टून डिझाइन्स सध्या विशेष प्रसिद्ध आहेत. त्याशिवाय फोन केसेस, पाऊचही जरा हटके पर्याय ठरेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज