बॅकलेस पोल्का डॉट टॉप
अभिनेत्री हृता दुर्गुळे पती प्रतीक शाहसोबत थायलँडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय. हृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर थायलँड व्हेकेशनचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये हृताचा अनोखा अंदाज पहायला मिळतोय. यावेळी तिने बॅकलेस पोल्का डॉट टॉप आणि त्या खाली त्या सारखाच स्कर्ट परिधान केला आहे. यावेळी हृता समुद्रामध्ये मजा करताना दिसत आहे.
(वाचा :- डिपनेक ब्लाऊज घालून मीरा कपूरचा हॉट अंदाज, ही दोन मुलांचा आई आहे या गोष्टीवर विश्वासच बसणार नाही)
फोटो सोशल मीडियावर व्हायरल
18 मे रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली. लग्नापूर्वी हृता आणि प्रतीक एकमेकांना काही वर्षे डेट करत होते. एका कार्यक्रमात हृताची पहिल्यांदा ओळख प्रतीकशी झाली आणि पहिल्याच भेटीत दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.काही दिवसांपूर्वी हृता आणि प्रतीक इस्तांबूलला हनिमूनला गेले होते. तेव्हाचेही तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
(वाचा :- पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये प्राजक्ता माळीने घेतले महादेवाचे दर्शन, लूक पाहून फोटोवर कमेंट्सचा पाऊस)
व्हाईट जॅकेटची जादू
यावेळी हृताने पोल्का डॉट टॉपवर व्हाईट रंगाचे जॅकेट देखील घेतले आहे. त्यामुळे तिचा लूक खूपच सुंदर दिसत होता. तुम्ही देखील अशा डिपनेक ड्रेसवर छानसे जॅकेट घेऊ शकता.
(वाचा :- पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये प्राजक्ता माळीने घेतले महादेवाचे दर्शन, लूक पाहून फोटोवर कमेंट्सचा पाऊस)
कलरफुल ड्रेस
या ट्रिपचे अजून काही फोटो हृताने शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने कलरफुल असा ड्रेस परिधान केला आहे. थायलँडमधील फि-फि आयलँडवर हृताने खास फोटोशूट केलं. फुकेत आणि थायलँडमधील निसर्गरम्य दृश्यदेखील या फोटोंमध्ये पहायला मिळतंय.
शूजने वेधले लक्ष
यावेळी हृताने चेक्सचे शूज घातले होते. या कलफुल ड्रेसवर तिचे हे शूज खूपच सुंदर दिसत होते. तुम्ही देखील एखाद्या ट्रिपला गेल्यावर असे शूज परिधान करु शकता.