Marathi Actress Prajakta Mali Upload Photo In Black Dress
हसीन दिलरुबा.. प्राजक्ता माळीचे ऑफ शोल्डर ड्रेसमधील फोटो पाहून चाहते गपगार
Prajakta Mali Latest Post: मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या बोल्ड अदांनी नेहमीच सर्वांना घायाळ करते मोहक अदांनी आणि फॅशनसेन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेते. अशातच प्राजक्ताच्या काळ्या रंगाच्या शिमरी ड्रेसमधल्या फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहेत. या फोटोवर युजर्सने अनेक कमेंट्स केल्या आहेत.
Authored byमृणाल पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम12 Nov 2022, 9:44 am
मराठी कलाक्षेत्रातील अभिनेत्री प्राजक्ता माळी (prajakta mali) तिच्या मोहक अदांनी आणि फॅशनसेन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेते. अशातच प्राजक्ताने सोशल मीडियावर ऑफ शोल्डर असणारा बॅकलेस ड्रेस परिधान करुन फोटो शेअर केले आहेत. यावेळी प्राजक्ताने सुंदर असा ब्लॅक रंगाचा शिमरी ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसचा पॅर्टन ऑफ शोल्डर ठेवण्यात आला होता. तर बॅकलेस असणाऱ्या या ड्रेसमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे. प्राजक्ता तिच्या सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे फोटो शेअर करत असते. प्राजक्तानचा हा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या फोटो सोबत प्राजक्ताने जवान जानेमन..हसीन दिलरुबा… मिल जो दिल जवाँ… असे कॅप्शन दिले आहे.
(फोटो सौजन्य : @prajakta_official)
प्राजक्ताचा ड्रेस
प्राजक्ता सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते आणि ती या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. बऱ्याचदा सोशल मीडियावरील ती तिचं फोटोशूट शेअर करत असते. यावेळी प्राजक्ताने शिमरी पॅटर्न असणारा ड्रेस परिधान केला होता. या ब्लॅक ड्रेसला वनसाईड हॅन्ड देण्यात आला होता. या सुंदर ड्रेसमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे.
प्राजक्ता माळी (Prajakta Mali)ने आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे. यावेळी प्राजक्ताने सिम्पल असा मेकअप केला होता. यावेळी ड्रेसला मॅचिंग असे शिमरी आयलायनर तिने लावले होते. एखाद्या पार्टीला तुम्ही असा लूक ट्राय करु शकता.
यावेळी प्राजक्ताने ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला आहे. यासुंदर ड्रेसमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसत होती. ती या ड्रेसमध्ये तीच्या कॅप्शन प्रमाणेच हसीन दिलरुबा दिसत आहे.
यावेळी चाहत्यांनी त्यांच्या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. प्राजूने तिचं लेटेस्ट फोटोशूट शेअर केलं आहे. ज्यापाहून चाहते घायाळ झाले आहेत. या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. या फोटोशूटवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.दिवसेंदिवस प्राजक्ताच्या फॅन्सच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.
या फोटोवर चाहत्यांनी मिले जो दिल जवा.. शिकार हो गया.., और .... शिकारी खुद यंहा शिकार हो गया ...., मिले जो दिल वहा हसीन निखार हो गया, गॉर्जिअस अँड ब्युटीफुल अशा कमेंट्स केल्या आहेत.
"मृणाल पाटील जनसंपर्क, प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल मीडियामधील मराठी पोर्टल्सचा 8 वर्षांचा अनुभव. मीडिया क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव असून कोणत्याही विषयावर संवेदनशील लेखन करण्यास आवडते. याशिवाय एका प्रतिष्ठीत न्यूज चॅनलसाठी व्हिडिओचा देखील अनुभव आहे.
खास करून मनोरंजन, फिचर स्टोरीज, लाइफस्टाईल, विषेश न्युज सेलिब्रेटी मुलाखती यामध्ये विशेष आवड. वाचकांनी अधिका-अधिक माहिती देणारे लेख लिहिण्यात पारंगत. प्रत्येक गोष्ट थेट आणि अचूक पोहचवण्यात अधिक काम केले आहे. वाचकांना वेगळे काय देता येईल यासाठी सतत प्रयत्न केले आहे. वाचनाची, सोलो ट्रॅव्हलिंगची प्रचंड आवड आहे. वेगवेगळ्या जागा पाहून तेथील मूळ संस्कृती, माणसे या गोष्टी जाणून घेण्याची नेहमीच उत्सुकता असते. "... आणखी वाचा
We use cookies and other tracking technologies to provide services in line with the preferences you reveal while browsing the Website to show personalize content and targeted ads, analyze site traffic, and understand where our audience is coming from in order to improve your browsing experience on our Website. By continuing to browse this Website, you consent to the use of these cookies. If you wish to object such processing, please read the instructions described in our privacy policy/cookie policy.