तिच्या यावेळच्या फॅशन चॉइसेस एवढ्या भारी होत्या की तिच्यापुढे हॉलीवूडच्या कित्येक अप्सरा सुद्धा फिक्या पडल्या. असेच तिचे एक जबरदस्त आणि दिलखेचक फोटोशूट समोर आले आहे. स्वत: प्रियांकाने हे फोटो शेअर केले आहेत. कॅलिफोर्नियामधील एका मॅगझिनसाठी तिने हे फोटोशूट केल्याचे कळते. यातील तिच्या अदा कोणालाही सहज घायाळ करणाऱ्या आहेत. (फोटो सौजन्य :- इंस्टाग्राम @priyankachopra)
बोल्ड ड्रेसमध्ये दिसली प्रियांका
प्रियांका चोप्राने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती नीलमणी निळ्या रंगाच्या बोल्ड ड्रेसमध्ये दिसत आहे. हॉल्टर डिटेलसह या लाँग आउटफिटमध्ये डीप प्लंगिंग नेकलाइन देण्यात आली होती. बाजूला एक लॉंग कट होता, जो खांद्यापासून बिकिनीच्या भागापर्यंत दिसत होता. ड्रेसच्या कमरेला गाठ बांधलेली होती आणि तिचे टोन्ड पाय मस्त फ्लोन्ट होताना दिसत होते. या फोटोशूटमध्ये प्रियांकाच्या एका हातावर वर्ल्ड मॅपचा टॅटूही दिसत होता.
(वाचा :- हिरवागार स्लिट कट ड्रेस, कातील अदांनी इंटरनेटवर आग लावलेली असतानाच सनी लिओनीचा छोटासा डीपनेक टॉपमधील फोटो समोर)
बॅकलेस ड्रेसमध्ये दिली मादक पोझ
प्रियांकाने आपल्या दुसऱ्या लुकमध्ये निऑन ग्रीन बॅकलेस ड्रेस घातलेला दिसतो आहे. साध्या दिसणार्या ह्या गाऊनला गोलाकार नेकलाइन होती आणि मागच्या बाजूला बॅकलेस ठेवण्यात आले होते, ज्यामध्ये ती तिची बॅक फ्लोन्ट करताना दिसली. या सोबत तिने गोल्डन चोकर नेकलेस आणि हलका मेकअप करून आपला लुक राउंड ऑफ केला होता.
(वाचा :- मिडी ड्रेसमध्ये नवरा राजपाल यादवचा हात घट्ट पकडून राधाने मारली भरगच्च गर्दीत एंट्री, भासली राधा-कृष्णाचीच जोडी)
स्टाईलबाबत काय म्हणाली प्रियांका?
मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत प्रियांकाने तिचे करियर, निक जोनास, पर्सनल स्टाईल बद्दल अनेक गोष्टी उलगडल्या आणि सोबतच तिने बेस्ट फॅशन एडव्हाइस देखील शेअर केली. आपल्या स्टाइलबद्दल बोलताना प्रियांका म्हणाली, 'माझी स्टाइल खूप पर्सनल आहे. मी माझ्या पर्सनल स्टाइलबद्दल खूप मूडी देखील आहे. सकाळी उठल्यावर माझा जसा मूड आहेत्यानुसार माझी त्या दिवसाची स्टाईल असते आणि मी जेवढ कम्फर्टेबल राहता येईल तेवढं राहण्याचा प्रयत्न करते.
(वाचा :- मलायका अरोराचा जलवा अमृतासमोर पार फिका, नाइट सूटमधील मलायकास मिनी वन शोल्डर ड्रेसमधील कातील बहिणीने दिली टक्कर)
काय आहे प्रियांकाची बेस्ट फॅशन अॅडव्हाइस?
प्रियांकाने सांगितले की, ती नेहमी रेड कार्पेटसाठी ती नेहमी सोबत फ्लॅट ठेवते. फॅशनेबल असण्यासोबतच कम्फर्टेबल राहणंही खूप महत्त्वाचं आहे असं ती आवर्जून सांगते. रेड कार्पेटचा इव्हेंट झाला की होताच ती तिच्या कम्फर्ट मध्ये जाते. प्रियांकाला तिच्या मूडनुसार कपडे कॅरी करायला आवडतात. तिला मिळालेली बेस्ट फॅशन एडव्हाइस सांगताना ती म्हणते की, “मला मिळालेली बेस्ट फॅशन एडव्हाइस म्हणजे जे कमी आहे तेच जास्त आहे.”
(वाचा :- जॅकलिन फर्नांडिजने जाळीदार मायक्रो मिनी स्कर्ट घालून लावली ऐन गरमीत सोशल मीडियावर आग, फिगर बघून श्वासच रोखाल)