अ‍ॅपशहर

रोहित खंडेलवाल ठरला 'मिस्टर वर्ल्ड'

'प्यार तुने क्या किया', 'ये है आशिकी' यांसारख्या मालिकांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या २६ वर्षीय रोहित खंडेलवालनं 'मिस्टर वर्ल्ड २०१६' चा किताब पटकावला. हा बहुमान मिळवणारा रोहित पहिला आशियाई आणि भारतीय ठरला.

Maharashtra Times 20 Jul 2016, 3:10 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rohit khandelwal wins the coveted title of mr world 2016
रोहित खंडेलवाल ठरला 'मिस्टर वर्ल्ड'


'प्यार तुने क्या किया', 'ये है आशिकी' यांसारख्या मालिकांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या २६ वर्षीय रोहित खंडेलवालनं 'मिस्टर वर्ल्ड २०१६' चा किताब पटकावला. हा बहुमान मिळवणारा रोहित पहिला आशियाई आणि भारतीय ठरला.

साऊथपोर्ट येथील फ्लोरल हॉलमधील साऊथपोर्ट थिएटरमध्ये 'मिस्टर वर्ल्ड' स्पर्धेचा अंतिम सोहळा रंगला. या स्पर्धेत जगभरातील ४७ जण सहभागी झाले होते. त्यांना मागे टाकत रोहितने या बहुमानासह ५० हजार डॉलरचे पारितोषिक मिळवले. यासोबतच त्यानं पेजंटमध्ये 'मिस्टर मल्टीमीडिया'चा किताबही आपल्या नावावर केला.

निवेदिता साबू यांनी डिझाइन केलेला टक्सीडो रोहितने यावेळी परिधान केला होता. मिस्टर वर्ल्डचा किताब जिंकणाऱ्या रोहितवर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान या स्पर्धेत मिस्टर पोर्तो रिको हा पहिला रनर-अप, मिस्टर मेक्सिको दुसरा रनर-अपचा मानकरी ठरला.

माझ्यासाठी अभिमानास्पदच!

मी मिस्टर वर्ल्डचा किताब पटकावला आहे यावर अजूनही विश्वास बसत नाही. हा आंतरराष्ट्रीय किताब पटकावणारा पहिला भारतीय ठरल्याचा मला अभिमान असून खूपच आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया रोहितनं दिली.

मी अजूनही जागतिक विजेतेपद पटकावले आहे असा विश्वास धरा करू शकत नाही. पहिला भारतीय असल्याने कधीही या शीर्षक आंतरराष्ट्रीय मला नितांत अभिमान आणि हर्षभरीत होतो पटकावले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज