अ‍ॅपशहर

नवा सेफ्टी आयकॉन!

प्रत्येक पर्समध्ये बाकी काही असो नसो.. सेफ्टी पिन असतेच असते. उसवलेल्या शर्टापासून चापून नेसलेल्या पदरावर ‘अंकुश’ ठेवण्याचं काम ती करते. म्हणूनच ती तशी मल्टिटास्किंग. प्रत्येकाच्या वापरातली ही पिन सध्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये स्टाइल आयकॉन बनली आहे.

Maharashtra Times 16 May 2016, 12:12 am
प्रत्येक पर्समध्ये बाकी काही असो नसो.. सेफ्टी पिन असतेच असते. उसवलेल्या शर्टापासून चापून नेसलेल्या पदरावर ‘अंकुश’ ठेवण्याचं काम ती करते. म्हणूनच ती तशी मल्टिटास्किंग. प्रत्येकाच्या वापरातली ही पिन सध्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये स्टाइल आयकॉन बनली आहे. प्राची आंधळकर, कॉलेज क्लब रिपोर्टर आता स्ट्रीट फॅशनच्या इंडस्ट्रीमध्ये सेफ्टी पिनचा काय संबंध असा प्रश्न पडू शकतो. तर सध्या बाजारात वेगवेगळ्या आकाराच्या, रंगेबिरंगी अशा डिझायनर सेफ्टी पिन मिळू लागल्या आहेत. आता तिचा वापर ज्वेलरीसाठीही केला जातो. तिच्या डिझायनिंगचा ट्रेंड सध्या इन आहे. स्प्रिंग समरसाठी स्पेशल असा हा सेफ्टी पिन ज्वेलरी ट्रेंड सध्या खूप गाजतोय. छोट्या मोठ्या आकारातल्या सेफ्टी पिनांना एकत्र करून चेनमध्ये अडकवलेले सुंदर चोकर पीस सध्या मार्केट मध्ये मिळतायत. मोती, ग्लिटर्स, डायमंड, क्रिस्टलचा वापर कलेल्या सेफ्टी पिन्सना सध्या जास्त मागणी आहे. त्याशिवाय मोठ्या आकारातल्या डायमंड लावलेल्या सेफ्टी पिनना इअर कफ म्हणून घालता येतं. पॉपस्टार रिहाना तिच्या कॉन्सर्टसाठी अशाच प्रकारचे इअर कफ वापरते. तसंच सेफ्टी पिनचे भन्नाट कानातलेही मिळू लागले आहेत. या पिनला आकार देऊन त्याची रिंगही सध्या मार्केटमध्ये मिळते. ब्रेसलेट्समध्येही डिझाइन्स मिळतील. हार्टशेप, सर्कल, आयत अशा विविध आकारातल्या सेफ्टी पिन्स खूप प्रसिद्ध आहे. चंदेरी, सोनेरी रंगात तसंच मॅटालिक रंगाच्या सेफ्टी पिन्सना जास्त मागणी आहे. सेफ्टी पिन्सची फक्त ज्वेलरीच नाही, तर कपड्यावर नक्षीकाम करण्यासाठीही या सेफ्टी पिन्सचा वापर केला जातो. फोरमल ब्लेझरवर बो पिनऐवजी वेगवेगळ्या सेफ्टी पिन्स वापरून डिझाइन करता येते. अँजल विंग्स, फेदर पीस, शर्ट कॉलर डिझाइन्स, शर्टाला बटणाऐवजी डिझायनर सेफ्टी पिन्स लाऊन कूल लूक आणता येतो. कपड्याच्या शिलाईच्या जागी या सेफ्टी जीन्सना दोन-तीन सेफ्टी पिन्स लाऊन डिझाइन्स करता येतं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम safety pins in trend
नवा सेफ्टी आयकॉन!


या पिन्सचं स्टायलिंग करण्याआधी घ्यायची काळजी.. * सेफ्टी पिन ही धातूची असल्यामुळे गरमीमध्ये त्याचा त्रास होऊ शकतो. घामोळ्या येत असतील, तर वापर काळजीपूर्वक करा. * सेफ्टी पिन अचानक उघडली जाऊन ती टोचणार नाही याची आवश्यक काळजी घ्या. * ज्वेलरी म्हणून वापरण्यापूर्वी ती टिशू पेपरने पुसा. या ज्वेलरीवर परफ्युम मारू नका. त्यामुळे गंजण्याची शक्यता वाढते. * सेफ्टी पिन डिझाइन्स करताना त्या सुटसुटीत असाव्यात.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज