अ‍ॅपशहर

छोट्या गॉगल्सचा ट्रेण्ड

तुम्ही सनग्लास खरेदी करण्याचा विचार करीत आहात तर सध्या ट्रेण्ड मायक्रो ग्लासचा आहे आकाराने जितका लहान गॉगल तितकी त्याची मागणी अधिक...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Jun 2019, 2:23 pm
तुम्ही सनग्लास खरेदी करण्याचा विचार करीत आहात तर सध्या ट्रेण्ड मायक्रो ग्लासचा आहे. आकाराने जितका लहान गॉगल तितकी त्याची मागणी अधिक. नव्वदच्या दशकात गॉगलची ही फॅशल खुपच लोकप्रिय ठरली होती. आता त्याचे चलन पुन्हा वाढले आहे. बाजारात पुन्हा एकदा या गॉगल्सचा ट्रेण्ड वाढला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम small goggles trend
छोट्या गॉगल्सचा ट्रेण्ड


आलिया भट, सोनम कपूर, कंगना रनौट आणि अनुष्का शर्मा गत काही दिवसांपासून चर्चेत आहेत. लहान आकाराच्या गॉगल्समध्ये त्या दिसून आल्या. याप्रकारातील गॉगल्सचा स्किनी गॉगल्स म्हणतात. नव्वदच्या दशकात ही फॅशन चलनात होती. तीच फॅशन आता पुन्हा परतली आहे. स्कीन सलग्लासेसमध्ये पर्पल, लाल, काळ्या रंगांसारखे रंग चलनात आहेत. फ्रेम्सच्या बाबतीत बोलायचे झाल्यास हेक्सागनल, कॅटआय, फ्लॅट ओव्हल फ्रेम्सची मागणी अधिक आहे. वेगवेगळ्या आकारांबाबतही प्रयोग केले जात आहेत. मात्र अधिकतर लहान आकाराच्या सनग्लासेसलाच पसंती दिली जात आहे. त्यातल्या त्यात गोलाकार फ्रेम्सची मागणी जास्त आहे. लालसर, ऑरेंजी आणि अन्य फिक्कट रंगांनाही बऱ्यापैकी मागणी आहे.

कुठे कोणता सनग्लास?

डार्क टिन्टेड ग्लास सर्वोत्तम लूक देतो. बीच पार्टी आणि ब्रंच पार्टीसाठी याप्रकारातील सनग्लासेस योग्य निवड आहे.

जिओमॅट्रिक फ्रेम असलेले ग्लासेस खुपच फॅन्सी दिसतात. एखाद्याच्या स्टाइलला तुम्हाला मात द्यायची असल्यास या प्रकारातील फ्रेम वापरता येईल.

चौकोनी फ्रेम्सच्या तुलनेत यावर्षी राऊंड फ्रेम्सची मागणी अधिक आहे. राऊंड फ्रेमची क्रेझ पुन्हा एकदा परतली आहे.

मॉडर्न कॅटआय सनग्लासेसला या मोसमात अधिक मागणी आहे. कॅट आय प्रकार सनग्लासेसमधला अत्याधुनिक प्रकार आहे.

तुम्ही तुमच्या लूकसोबत प्रयोगशील राहण्यास इच्छुक असाल तर क्लासिक अॅव्हिएटर प्रकारातील चष्म्यांचा वापर करावा.

या बाबी ठेवा लक्षात

उन्हाळ्याच्या दिवसांत ग्रे रंगाच्या चष्म्यांचा वापर करावा. ज्यांना दृष्टीदोष असेल तर करड्या रंगांचे लेन्स वापरले पाहिजे.

सनग्लासेस खरेदी करताना एका गोष्टीचे विशेष लक्ष ठेवावे ते म्हणजे फ्रेम खुप भारी, वजनदान नसावी.

ब्राण्डवर अधिक भर द्यावा. लाख मोलाच्या डोळ्यांसाठी हलक्या ब्राण्डचे गॉगल्स खरेदी करू नयेत.

तीव्र सूर्यकिरणे केवळ त्वचेलाच नाही तर डोळ्याचा रेटिना, लेन्स आणि कार्नियालाही नुकसान पोहोचविते. त्यामुळे असा गॉगल खरेदी करावा ज्यात यूवीबी आणि यूव्ही किरणे अडविण्याची क्षमता आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज