अ‍ॅपशहर

इथे धोका आहे

टॅटूजच्या प्रेमात असलेली तरुणाई त्याला आणखी कूल लूक येण्यासाठी त्या डिझाइनला साजेसे खडे किंवा रिंग टोचून घेऊ लागलीय. म्हणजेच टॅटूवर पिअर्सिंग केलं जाऊ लागलंय. पण पिअर्सिंगच्या वाढत्या प्रकारामुळे त्वचेला ‘इन्फेक्शन’ होण्याचं प्रमाण वाढताना दिसतंय.

Maharashtra Times 10 May 2016, 2:54 am
शब्दुली कुलकर्णी कॉलेज क्लब रिपोर्टर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tatoo
इथे धोका आहे


पिअर्सिंगच्या वाढत्या प्रकारामुळे त्वचेला ‘इन्फेक्शन’ होण्याचं प्रमाण वाढताना दिसतंय. स्टाइल म्हणून अंगावर टॅटू काढून घेण्याचा ट्रेंड असला, तरी ही स्टाइल वेळप्रसंगी जीवावर बेतू शकते असा इशारा डॉक्टर्स देतायत.

टॅटूजच्या प्रेमात असलेली तरुणाई त्याला आणखी कूल लूक येण्यासाठी त्या डिझाइनला साजेसे खडे किंवा रिंग टोचून घेऊ लागलीय. म्हणजेच टॅटूवर पिअर्सिंग केलं जाऊ लागलंय. पण पिअर्सिंगच्या वाढत्या प्रकारामुळे त्वचेला ‘इन्फेक्शन’ होण्याचं प्रमाण वाढताना दिसतंय. स्टाइल म्हणून अंगावर टॅटू काढून घेण्याचा ट्रेंड असला, तरी ही स्टाइल वेळप्रसंगी जीवावर बेतू शकते असा इशारा डॉक्टर्स देतायत. 'माय लव्ह', 'फॉरेव्हर लव्ह', 'लव्ह यू मा', 'डॅडीज लिटील एन्जल' असे किंवा अगदी सोशल मेसेज देणारे टॅटू सध्या तरुणाईमध्ये हिट आहेत. प्रेमात आकंठ बुडालेली तरुणाई तर त्याच्या किंवा तिच्या नावाचा टॅटू हमखास काढून घेते. केवळ तेवढंच नव्हे, तर सध्या निऑन रंगाचा टॅटू काढण्याचं फॅड जास्त आहे. या निऑन रंगामुळे, विशेषत: लाल रंगामुळे अॅलर्जी होते असं दिसून येतं. गळ्याभोवती, नाभी आणि मनगटावर टॅटू काढून त्यावर पिअर्सिंग केलं जातं, जे अतिशय धोकादायक असल्याचं सांगितलं जातं. गळा, नाभी आणि मनगटावरची त्वचा खूप नाजूक असते. त्यामुळे अशा त्वचेवर टॅटूवर पिअर्सिंग वरच्यावर केलं जातं. असे टॅटू किंवा पिअर्सिंग एखाद्या शिरेवर आल्यास ते जीवघेणं ठरु शकतं. त्याशिवाय ते पिअर्सिंग करुन लावलेली रिंग निघाल्यास गंभीर जखम होण्याचीही शक्यता असते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज