अ‍ॅपशहर

फ्लॅश इट!

यंदा गरब्यामध्ये टॅटू, मेंदीचे वेगवेगळे ट्रेंड पाहायला मिळणार आहेत त्याविषयी...

Maharashtra Times 1 Oct 2016, 12:12 am
यंदा गरब्यात मिरवण्यासाठी काहीतरी छान प्लॅन करत असाल तर मेंदी आवर्जून काढा. पण ही मेंदी जरा हटके आहे आणि ही मेंदी लावल्यावर लाल रंग येत नाही तर पांढरा रंग येतो. अशा भन्नाट व्हाईट हेना मेंदीचा ट्रेंड सध्या पाहायला मिळतोय. त्याशिवाय टॅटूचे वेगवेगळे प्रकारही हिट आहेत. याच हटके ट्रेंडविषयी...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tattoo trends this navratri season
फ्लॅश इट!

यंदा गरब्यामध्ये टॅटू, मेंदीचे वेगवेगळे ट्रेंड पाहायला मिळणार आहेत त्याविषयी...
व्हाईट हेना
मेंदीसारख्याच डिझाइन्स व्हाईट हेनासाठी काढल्या जातात. अरेबिक, ब्रायडल, फ्लोरल अशा भन्नाट डिझाइन्स व्हाईट हेनामध्ये छान दिसतात. व्हाईट हेनासोबत कलरफुल ग्लिटर मेंदी ही नवरात्रीत चार चांद लावेल. व्हाईट हेना मेंदीचा कोनही मिळतो. व्हाईट हेनावर मेटॅलिक टॅटू स्टिकर्स ही लावू शकता. तसेच ऑक्सिडायज्ड दागिन्यांवर व्हाईट हेना मेंदी छान दिसते. व्हाईट हेना कोन सध्या मालाड मार्केट, कुर्ला मार्केट येथेच त्याशिवाय ऑनलाइनही उपलब्ध आहे.
मेटॅलिक टॅटू
बोहो स्टाइलचं हे मेटॅलिक टॅटू चंदेरी, सोनेरी रंगात काढलं जातं. हे टॅटू दांगिन्यांसारखं घालू शकता. यंदा मार्केटमध्ये ही या टॅटू प्रकाराच्या स्टीकर्स स्ट्रीप मुबलक प्रमाणात मिळू लागल्या आहेत. साधारण दोन ते तीन दिवस हे टॅटू राहतं.
फ्लॅश टॅटू
फ्लॅश टॅटू हा टॅटूचा प्रकार दिसायला खूप आकर्षक आहे. विविध रंगांचा वापर करुन हे फ्लॅश टॅटू बनवले जातात. मेंदीच्या डिझाइन्स, चंद्र-सूर्य, मोराचं पिस, रंगकमळ अशा वेगळ्या हटके डिझाइन्स या फ्लॅश टॅटूमध्ये वापरले जातात.
संकलन- प्राची आंधळकर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज