अ‍ॅपशहर

चष्मिश तरी स्टायलिश!

एखाद्या व्यक्तीशी डोळ्यांतून संवादही साधता येतो. पण चष्म्यामुळे तुमच्या सुंदर डोळ्यांचं सौंदर्य कमी होतंय असं वाटतं तुम्हाला वाटतं का? तर आमच्याकडे आहेत तुमच्यासाठी काही खास टिप्स -

Maharashtra Times 28 Jun 2017, 10:12 am
एखाद्या व्यक्तीशी डोळ्यांतून संवादही साधता येतो. पण चष्म्यामुळे तुमच्या सुंदर डोळ्यांचं सौंदर्य कमी होतंय असं वाटतं तुम्हाला वाटतं का? तर आमच्याकडे आहेत तुमच्यासाठी काही खास टिप्स -
महाराष्ट्र टाइम्स.कॉम the glasses are stylish
चष्मिश तरी स्टायलिश!


भुवयांचा आकार नेटका ठेवा

भुवयांचा आकार नीट नसेल तर तो सौंदर्यला बाधक ठरू शकतो. त्यामुळे चष्माच्या फ्रेमला साजेशा ठरतील अशा भुवया कोरा. चष्म्याची फ्रेम लहान असेल तर भुवया पातळ ठेवा. चष्म्याची फ्रेम जाड आणि मोठी असेल तर भुवया जाड ठेवा.

मॅट फाऊंडेशन, ब्लशचा वापर करा

तेलकट चेहऱ्यावर साधं फाऊंडेशन वापरल्यास चेहरा आणखी तेलकट होऊन चष्मा घसरून नाकावर येऊ शकतो. त्यामुळे मॅट फाऊंडेशन वापरा.

वॉटर रेसिस्टंट फॉऊंडेशनसुद्धा बाजारात उपलब्ध आहे. थोडी डस्टिंग पावडरही तेलकटपणा कमी करण्यास मदत करू शकते.

डोळ्यांचा मेकअप चांगला करा

चष्म्यामुळे डोळे लगेच लक्ष वेधून घेतात. त्यामुळे डोळ्यांचा छान मेकअप करा. हलके आणि आकर्षक रंगाचे आयशॅडो वापरा. फ्रेमच्या रंगाला साजेशा असा आयशॅडोचा रंग वापरा. अतिभडक किंवा चमकणारे आयशॅडो लूक बिघडवू शकतात.

लायनर लावा

लायनर लावण्याने डोळे अधिक सुरेख दिसतात. पण त्याच्या वापर हुशारीने करा. जाड किंवा भडक फ्रेम असल्यास थोडं जाड लायनर लावा. पण फ्रेमलेस किंवा पातळ फ्रेम असल्यास डोळ्यांवर लायनरची हलकीशी रेष द्या. थोडा वेळ घ्या आणि दोन टप्प्यात लायनर लावा. पापण्यांच्या वरील भागास थीन लिक्विड लायनर लावून खालील भागास न्यूड शेडच लायनर लावा. यामुळे डोळ्याला एक वेगळा लूक येईल.

ओठ नैसर्गिक ठेवा

डोळे आणि ओठ हे चेहऱ्यावरील सौंदर्य स्थळे आहेत. पण नेहमी एकावर लक्ष केंद्रित करा. चष्म्यामुळे प्रामुख्याने डोळे लक्ष वेधून घेत असल्याने डोळ्यांचा चांगला मेकअप करा. तुलनेने ओठ नैसर्गिक ठेवा किंवा लाइट शेडचा लिपबाम, लिपस्टिक वापरा.

पार्टीसाठी खास लूक

पार्टीसाठी जाताना तुम्ही डोळ्यांचा छान मेकअप करून ग्लॉसी लिपस्टिक लावू शकता. थोडं जाड लायनर लावलं की तुम्ही पार्टीसाठी तयार. स्मोकी आइज आणि लाइट शिमर तुमचं रूप आणखी खुलवेल.

संकलन - दीपाली सकपाळ, कॉलेज क्लब रिपोर्टर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज