2021 च्या आधी नीरज चोप्रा हे नाव कोणालाच माहित नव्हते, पण त्याच वर्षी झालेल्या टोकियो ऑलम्पिकमध्ये त्याने गोल्ड मेडल मिळवले आणि तेव्हापासून आता पर्यंत त्याचे आयुष्य पूर्णपणे पालटूनच गेले आहे. केवळ लाईफच नाही तर स्टाईल आणि फॅशनच्या बाबतीत नीरज चोप्राचे झालेले ट्रान्सफॉर्मेशन थक्क करणारे आहे. चला तर आज पाहुया किती भन्नाट आहे या जबरदस्त खेळाडूचा जबरदस्त स्टाईल सेन्स! (फोटो सौजन्य :- इंस्टाग्राम@neerajchopra)
क्युट बॉय लुक
टी-शर्ट आणि पायजामा परिधान केलेल्या नीरजचे त्याच्या खेळाबद्दलचे प्रेम या फोटोंमधूनही स्पष्टपणे दिसून येते. तथापि, त्याच्या जुन्या लुकची आजच्या तुलना केल्यास, नीरज किती क्युट बॉय होता आणि आजही आहे हे तुम्ही देखील नक्कीच मान्य कराल!
(वाचा :- प्रियांका चोप्राने खांद्यापासून बिकिनी एरियापर्यंत कट व बॅकलेस होऊन दिल्या पोझ, चाहत्यांना 440 व्होल्टचा धक्का)
टी-शर्ट लव्हर
एक गोष्ट नक्की आहे की नीरजचे टी-शर्ट्स प्रेम खूप जुने आहे. म्हणजेच त्याला टी-शर्टस परिधान करायला खूप आवडतात आणि हे फोटोज त्याचीच साक्ष देतात. केवळ जिम किंवा सराव करतानाच नाही तर कॅज्युअल लूकसाठी सुद्धा तो अनेकदा टी-शर्ट परिधान करण्यालाच पसंती देतो.
(वाचा :- हिरवागार स्लिट कट ड्रेस, कातील अदांनी इंटरनेटवर आग लावलेली असतानाच सनी लिओनीचा छोटासा डीपनेक टॉपमधील फोटो समोर)
मग झाले हे ट्रान्सफोर्मेशन
ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज रातोरात स्टार झाला आणि अनेक प्रोजेक्ट्सचा भाग बनला, ज्यापैकी काहींसाठी त्याने फोटोशूटही केले. या फोटोंमध्ये, तो रोहित बलने डिझाइन केलेल्या भारतीय पोशाखामध्ये त्याचा देखणा लुक कोणत्याही तरुणीला घायाळ करणारा आहे. नीरज चोप्राचे फोटोशूट त्याच्या स्टाईल मध्ये झालेल्या ट्रान्सफोर्मेशनचे उत्तम उदाहरण आहे.
(वाचा :- मिडी ड्रेसमध्ये नवरा राजपाल यादवचा हात घट्ट पकडून राधाने मारली भरगच्च गर्दीत एंट्री, भासली राधा-कृष्णाचीच जोडी)
कुल आणि हँडसम मॅन
सूट-बूट आणि स्नीकर्ससह टी-शर्टप्रेमी नीरजचे हे फोटो व्हायरल झाले होते. यामध्ये तो इतका मस्त आणि देखणा दिसत होता की अनेकांनी अगदी त्याला बॉलीवूड मध्ये एन्ट्री करण्याचाही सल्ला दिला. अनेकांना त्याच्यात नेक्स्ट सुपरस्टार दिसला. या फोटोंमध्ये नीरजच्या चेहऱ्यावरस्टाईल कॅरी करण्याचा आत्मविश्वास स्पष्टपणे दिसतो आहे.
तरुणींना वेड लावणारे लुक्स
एका सुप्रसिद्ध मॅगझिनसाठी केलेल्या फोटोशूटमध्ये नीरजने त्याच्या जबरदस्त लेटेस्ट फॅशनचा करिष्मा तर दाखवलाच, पण मॉडेलसारखे एक्सप्रेशन देऊन त्याने अनेकांना तोंडात बोटे घालायला लावली. त्यामुळे मुलीही त्याच्या प्रेमात पडल्या हे काही वेगळ्याने सांगायला नको.
(वाचा :- जॅकलिन फर्नांडिजने जाळीदार मायक्रो मिनी स्कर्ट घालून लावली ऐन गरमीत सोशल मीडियावर आग, फिगर बघून श्वासच रोखाल)
तेव्हा आणि आता
ह्या फोटोंमध्ये तुम्ही नीरजच्या आधीच्या आणि नंतरच्या स्टाईल मधील ट्रान्सफोर्मेशन स्पष्टपणे पाहू शकता. एका सामान्य घरातील मुलाने आपल्या मेहनतीने कमवलेली यशस्वी लाईफस्टाईल सुद्धा यातून स्पष्टपणे दिसून येते.
(वाचा :- मलायकाने टाकलं उर्फीला मागे, छातीपासून कंबरेपर्यंत कट असलेल्या ड्रेसमधून अभिमानाने फ्लॉंट केल्या आईपणाच्या खुणा)