अ‍ॅपशहर

ब्रेकअप के बाद...

ब्रेकअप झाल्यानंतरचं दु:ख कित्येकदा सहन करण्यापलीकडचं असतं. या दु:खात अनेकजण चुकीचं पाऊल उचलतात. अशावेळी मनाला कसं सावरावं, याविषयी...

Maharashtra Times 7 Jun 2018, 4:00 am
ब्रेकअप झाल्यानंतरचं दु:ख कित्येकदा सहन करण्यापलीकडचं असतं. या दु:खात अनेकजण चुकीचं पाऊल उचलतात. अशावेळी मनाला कसं सावरावं, याविषयी सांगताहेत डॉ. सागर मुंदडा, एमबीबीएस, एमडी, मेंदू मनोविकार व व्यसनमुक्ती तज्ज्ञ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम after the breakup
ब्रेकअप के बाद...


एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडल्यावर दिवस-रात्र त्याच व्यक्तीचा विचार केला जातो. त्या व्यक्तीला काय आवडतं किंवा नाही आवडत, हाच विचार प्राधान्यक्रमावर असतो. असे हे गुलाबी दिवस अनोखे वाटू लागतात. पण पुढे जाऊन काही कारणास्तव या नात्यात फूट पडल्यास ते दु:ख सहन करण्यापलीकडचं असतं. कित्येक वर्षं एकत्र आनंदानं घालवल्यानंतर बिनसणारी जोडपी अनेक आहेत. अशा वेळी मनाची समजूत काढणं अतिशय कठीण असतं. एकेकाळी ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं होतं ती व्यक्ती बिनसल्यावरही आपल्या आयुष्यात असेल तर आणखीन जास्त त्रास होतो. अशावेळी स्वत:ला कसं सावरावं याविषयी आजच्या लेखातून जाणून घेऊयात.

सकारात्मक सिग्नलची गरज

ब्रेकअपनंतर भावनिक त्रास होणं साहजिक आहे. पण कालांतरानं या दु:खाचाही विसर पडतो. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील हरवलेला आनंद पुन्हा आणायचा असेल तर खोटं का होईना पण हसा. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल. पण कित्येकदा खोटं हसल्यानंही सकारात्मक सिग्नल मेंदूला जातात. ज्यानं तुमचा मूड ठीक होतो.

भावनांना वाट करून द्या

तुम्हाला खूप राग आला असेल तर तो बाहेर पडण्यासाठी वाट मोकळी करुन द्या. तुम्हाला आवडणारी गाणी ऐकत वॉकला जा. पंचिंग बॅगला पंच करुनही तुम्ही भावनांना वाट मोकळी करुन देऊ शकता. मनाची समजूत काढेपर्यंत खूप वेळ जाईल, तेवढा वेळ घ्या. 'यातून बाहेर पड', असं सांगणारी अनेक मंडळी असतात. पण तुम्हाला हवा तेवढा वेळ जरुर घ्या. याविषयी तुमच्या जवळच्या व्यक्तीशी बोला. हवं असल्यास मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्या. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्हाला अनेकदा वाटेल की तुम्हाला झालेल्या गोष्टींचा विसर पडला आहे. पण पूर्ण विचार करुन पुढचं पाऊल टाका.

अनेकजण नकारात्मक विचारांना घाबरतात. ते टाळण्यासाठी काहीही करायला तयार असतात. असं न करता विचारपूर्वक निर्णय घ्या.

शब्दांकन- शब्दुली कुलकर्णी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज