अ‍ॅपशहर

व्हा जरा खंबीर आणि स्मार्ट!

बौद्धिक क्षमतेच्या जोरावर कोणतंही यशाचं शिखर चढणं अवघड नसतं. पण बुद्धिमत्तेला भावनिक आधाराचीही जोड लागते. कित्येकजण बौद्धिकदृष्ट्या सक्षम असले तरी भावूक असतात. काहीजण भावनिकदृष्ट्या खंबीर असतात. भावनिकदृष्ट्या सक्षम असलेल्या व्यक्ती काही प्रसंगी अतिशय स्मार्टपणे वागतात.

Maharashtra Times 7 Sep 2016, 9:55 am
डॉ. सागर मुंदडा, मानसोपचारतज्ज्ञ, जे. जे. हॉस्पिटल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम be strong and very smart
व्हा जरा खंबीर आणि स्मार्ट!


बौद्धिक क्षमतेच्या जोरावर कोणतंही यशाचं शिखर चढणं अवघड नसतं. पण बुद्धिमत्तेला भावनिक आधाराचीही जोड लागते. कित्येकजण बौद्धिकदृष्ट्या सक्षम असले तरी भावूक असतात. काहीजण भावनिकदृष्ट्या खंबीर असतात. भावनिकदृष्ट्या सक्षम असलेल्या व्यक्ती काही प्रसंगी अतिशय स्मार्टपणे वागतात. दोन्ही प्रकारचे लोक विशिष्ट प्रसंगी कसे वागतात याच्या सात स्मार्ट सवयी खालीलप्रमाणे -

भावूक मंडळी लोकांच्या समस्यांचा, अडचणींचा जास्तीत जास्त विचार करतात. एवढंच काय तर त्यांच्या जागी स्वत:ला ठेवून त्यांच्या दृष्टिकोनातून विचार करायला लागतात. उदाहरणार्थ, दुसऱ्या कोणाचं ब्रेकअप झाल्यास भावूक मंडळी दुःखी होतात. याविरूद्ध भावनिकदृष्ट्या स्मार्ट लोक दुःखी व्यक्तींचं सांत्वन करुन विषय सोडून देतात. इतरांचं दुःख ते स्वत:च्या अंगावर घेत नाहीत. अशा व्यक्ती सल्ले देऊन किंवा योग्य मार्ग सुचवून बाजूला होतात.

एखादी समस्या उद्भवल्यास भावूक व्यक्ती खचून जाते किंवा त्या समस्यांचा बाऊ करते. त्याविरुद्ध भावनिकदृष्ट्या सक्षम असलेल्या व्यक्ती त्यांच्या सारासार बुद्धीला पटेल असा मार्ग काढून मोकळे होतात. भावनिकदृष्ट्या सक्षम असलेल्या व्यक्ती एखाद्या समस्येतून उद्भ‍वणाऱ्या परिणामांचाही विचार आधीच करतात.

भावनिकदृष्ट्या सक्षम असलेल्या व्यक्ती ध्येयवादी असतात. त्यांनी मनात एखादी गोष्ट ठरवली की ती मिळवण्यासाठी अथक परिश्रम करण्याची त्यांची तयारी असते.

भावूक व्यक्ती गॉसिप करण्यात धन्यता मानतात. याउलट भावनिकदृष्ट्या सक्षम असलेली व्यक्तींना गॉसिप करण्यात काही रस नसतो. कारण त्या जाणून असतात की, प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कमतरता असतात, ज्याची गॉसिप म्हणून चर्चा होत असते.

भावनिकदृष्ट्या सक्षम व्यक्तींना इतरांवर अवलंबून राहणं पसंत नसतं. अशा व्यक्तींना मानसिक आधाराची गरज भासत नाही.

भावनिकदृष्ट्या खंबीर असलेल्या व्यक्ती नकारात्मक विचारांना स्वत:पासून दूर ठेवतात. तसंच अशा व्यक्ती भूतकाळात जराही रमत नाहीत.

शब्दांकन- शब्दुली कुलकर्णी, कॉलेज क्लब रिपोर्टर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज