अ‍ॅपशहर

नैराश्यावर करा नियमित व्यायामाने मात !

कोणत्याही वयात व कोणत्याही ठिकाणी येणाऱ्या नैराश्यावर शारीरिक हालचाल अर्थात व्यायामामुळे मात करता येईल. येथील किंग्ज कॉलेजसह अन्य संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे. यासाठी त्यांनी मानसिक आजारांवर मात केलेल्या व्यक्तींच्या ४९ अभ्यास अहवालाचा आढावा घेतला. या आढाव्यातून, व्यायामामुळे किंवा शारीरिक हालचालींमुळे मानसिक आजार बळावण्याला लगाम घालता येतो हे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Apr 2018, 11:38 am
कोणत्याही वयात व कोणत्याही ठिकाणी येणाऱ्या नैराश्यावर शारीरिक हालचाल अर्थात व्यायामामुळे मात करता येईल. येथील किंग्ज कॉलेजसह अन्य संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे. यासाठी त्यांनी मानसिक आजारांवर मात केलेल्या व्यक्तींच्या ४९ अभ्यास अहवालाचा आढावा घेतला. या आढाव्यातून, व्यायामामुळे किंवा शारीरिक हालचालींमुळे मानसिक आजार बळावण्याला लगाम घालता येतो हे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम beat depression through exercise
नैराश्यावर करा नियमित व्यायामाने मात !

शारीरिक हालचाल कमी करण्याऱ्यांचे मन जराही दुखावले गेले तर त्यांना शारीरिक हालचाली किंवा नियमित व्यायाम करणाऱ्यांपेक्षा लवकर नैराश्य येऊ शकते. शारीरिक हालचाल किंवा व्यायामाचा उपयोग निराशा दूर ठेवण्यासाठी मुले व युवकांना सर्वाधिक होतो.

त्याचप्रमाणे प्रौढांना व जेष्ठांनाही त्यांना झेपणारा व्यायाम नियमित केल्यास नैराश्य दूर ठेवता येते. अशा प्रकारचा व्यायाम व नैराश्य यांचा संबध दाखवणारा जगातील पहिला अहवाल आहे.व्यायामामध्ये कवायती, कसरती आणि योगाभ्यस यांचा अंतर्भाव करणे यासाठी उपयुक्त आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज