अ‍ॅपशहर

Health Benefits Of Cloves : नियमित २ लवंग चघळल्याने होतात 'हे' आश्चर्यकारक फायदे!

मसाल्यांतील अनेक औषधी आणि महत्वपूर्ण घटकांनी भरलेली लवंग ही आपल्या आरोग्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे फायदेशीर ठरते. पण दातदुखी, तोंडाशी निगडीत इतर आजार किंवा दुर्गंधी याव्यतिरिक्त ही लवंग कोणकोणत्या आजारांवर रामबाण उपाय ठरते जाणून घ्या!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Jun 2020, 6:34 pm
लवंग आपल्या घरात आढळणारी एक सामान्य गोष्ट आहे. दैनंदिन आहारात बरेचसे पदार्थ हे लवंगीशिवाय अपुरे आहेत म्हणून प्रत्येक घरात लवंग आढळतेच. केवळ भारतच नाही तर अख्ख्या जगात लवंगीला मोठी मागणी आहे. एका फ्लॉवर बडच्या रुपात लवंग पूर्ण जगात प्रसिद्ध आहे आणि लोक याचा मोठ्या प्रमाणावर वापर सुद्धा करतात. पण मंडळी लवंग केवळ खाद्यपदार्थाला स्वाद आणण्यासाठी वापरली जात नाही तर हिचे काही औषधी गुणधर्म सुद्धा आहेत. अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्यांवर लवंगीचा प्राचीन काळापासून वापर केला जात आहे आणि याचे परिणाम देखील प्रभावशाली आणि जलद दिसून येतात. सर्वात जास्त मौखिक स्वच्छतेसाठी लवंगचा वापर केला जातो. तोंडाशी निगडीत अनेक समस्या लवंग वापरल्याने दूर होतात. आज आम्ही याच लवंगीचे काही अज्ञात गुणकारी फायदे तुम्हाला सांगणार आहोत, याचा वापर तुम्हीही नक्की करून पहा, तुम्हालाही फरक दिसून येईल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम benefits of eating cloves in marathi
Health Benefits Of Cloves : नियमित २ लवंग चघळल्याने होतात 'हे' आश्चर्यकारक फायदे!



दातांची वेदना दूर करण्यासाठी

लवंगीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण वापर होतो दातांची वेदना दूर करण्यासाठी! दातांमध्ये अचानक कधी कधी वेदना सुरु होतात त्यावेळी लवंगीचा वापर केल्याने आराम मिळतो. यासाठी एक कप पाण्यात लवंग चांगल्या रीतीने पाण्यात उकळवून घ्यावी आणि त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. आठवड्यातून तीन ते चार वेळेस हि प्रक्रिया केल्यास दातांमधील वेदना जलद गतीने नाहीश्या होतात. त्यामुळे तुम्हाला व ओळखीच्या कोणाला अचानक कधी दातांमध्ये वेदना सुरु झाल्यास लवंगीचा हा उपचार अवश्य करून पाहावा.

(वाचा :- Healthy Summer Fruits : उन्हाळ्यात द्राक्ष खाल्ल्याने होतात ‘हे’ फायदे!)

तोंडाची दुर्गंधी

तोंडाची दुर्गंधी हा अनेकांसाठी आजही चिंतेचा विषय आहे. यामुळे त्यांना कोणासमोर मनमोकळेपणाने बोलताही येत नाही आणि समोरच्या व्यक्तीच्या मनावरही वाईट छाप पडते. मात्र अशी समस्या असल्यास लवंग यावर गुणकारी ठरू शकते. मौखिक स्वच्छतेसाठी विविध प्रकारे लवंगीचा वापर केला जातो. ज्या लोकांच्या तोंडातून दुर्गंधी येते त्यांनी लवंग कुटून ती चावायला सुरुवात करावी. काही दिवसांतच तोंडातील हि दुर्गंधी कायमची नाहीशी होईल. मात्र ज्यांना कोणता मोठा आजार असेल अशा लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हा उपाय करावा.

(वाचा :- Types Of Cancer : कॅन्सरचे मुख्य प्रकार आणि लक्षणे याबाबत इत्यंभूत माहिती!)

तोंडात फोड येणे

सामान्यत: तोंडात फोड येण्यामागे कारणीभूत असतं साफ न झालेलं पोट! यापासून बचाव व्हावा म्हणून लोक नाना विविध उपाय करून पाहतात. मात्र कुटून बारीक केलेली लवंग १५ ते २० मिनिटे तोंडात ठेवल्याने तोंडातील फोडांच्या समस्येपासून मोठा आराम मिळतो. जे लोक तोंडातील फोडांच्या समस्येमुळे त्रस्त आहेत त्यांनी बारीक कुटलेली लवंग दिवसातून ३ ते ४ वेळा आपल्या तोंडात १५ ते २० मिनीटांसाठी ठेवावी. असं केल्याने तोंडातील फोडांच्या समस्येपासून लवकर आराम मिळतो.

(वाचा :- पायाची सूज करा दूर ‘या’ घरगुती रामबाण उपचारांनी!)

मानेचे दुखणे

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटलं असेल ना? पण हे अगदी खरं आहे. मानेच्या दुखण्यावर सुद्धा लवंग खूप गुणकारी ठरते. अनेकांना रात्री चुकीच्या झोपण्याच्या स्थितीमुळे मानेचे दुखणे सहन करावे लागते पण यापासून लवंग तुमचा बचाव करू शकते. लवंगीमध्ये शारीरिक वेदना कमी करण्याची मोठी क्षमता असते. १-२ ग्लास पाण्यात १० ते १५ लवंग उकळवून या पाण्याने दुखणाऱ्या भागावर शेक द्यावा. असे केल्याने मानेच्या वेदनेपासून जलद आराम मिळतो. मात्र यापासून सुद्धा वेदना कमी झाली नाही तर मात्र डॉक्टरांचाच सल्ला घेतलेला बरा!

(वाचा :- Low Blood Pressure : मधात मिसळून खा 'ही' गोष्ट, दूर होईल रक्तदाबाची समस्या!)

पोटातील जंत मारण्यासाठी

पोटातील जंताची समस्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना भोगावी लागते. या जंतांचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर पोटात वेदना होतातच पण आपल्या शरीराला देखील मोठा धोका निर्माण होतो. आपली पचन क्रिया बिघडून स्थिती हाताबाहेर जाऊ शकते. जेव्हा तुम्हाला वारंवार थुंकावेसे वाटेल किंवा तोंडात जास्त थुंकी जमा होईल तेव्हा समजून जावे की पोटातील जंतांचा धोका वाढत चालला आहे. ज्या लोकांना हि समस्या आहे त्यांनी दिवसातून किमान ३ वेळा लवंगचे सेवन करावे. लवंग या जंतांना मारण्यात मोलाची भूमिका बजावते. याच कारणांमुळे अनेक तज्ञ देखील पोटांतील जंतांवर लवंग खाण्याचा सल्ला देतात.

(वाचा :- Men's Health : लसूण आणि मधाच्या सेवनाने पुरुषांना होतील हे लाभ!)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज