अ‍ॅपशहर

करोना : अफवा विरुद्ध वास्तव

सोशल मीडियावर फिरत असलेल्या मेसेजपैकी नेमका कशावर विश्वास ठेवायचा आणि त्याचं सत्य काय आहे हे तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. हे तुम्हीही वाचा आणि शेअर करा, जेणेकरुन इतरांना फायदा होईल.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Mar 2020, 7:56 pm
करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता सोशल मीडियावर याविषयीच्या विविध अफवाही पसरू लागल्या आहेत. पण यातील चुकीच्या माहितीमुळे लोकांची चिंताही वाढत आहे. त्यामुळे व्हॉट्सअपवर आलेल्या प्रत्येकच मेसेजवर विश्वास ठेवायला पाहिजे असं नाही. सरकारने दिलेली माहिती हिच आधारभूत आहे आणि तिच्यावरच विश्वास ठेवणं गरजेचं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम corona


अफवा विरुद्ध वास्तव

दावा - जास्त पाणी प्यायल्याने करोना रोखण्यास मदत होते
वास्तव - याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. पण जास्त पाणी पिणं ही चांगली सवय आहे.

दावा - मिठ टाकून गरम पाणी प्यायल्याने करोना रोखण्यास मदत होते
वास्तव - व्हायरसवर खाऱ्या पाण्याचा कोणताही परिणाम होत नाही. तज्ञही याला दुजोरा देतात.

दावा - उष्णतेत करोना व्हायरस नाहीसा होतो

वास्तव - उष्णतेमुळे करोना व्हायरस नाहीसा झाल्याची पुष्टी नाही

दावा - लसूण खाल्ल्यामुळे करोनाचा धोका कमी होतो

वास्तव - लसूण खाल्ल्याने करोनाचा धोका कमी होत नाही

दावा - मास्क लावल्याने स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो

वास्तव - सर्दी, खोकला किंवा करोनाची लक्षणं आढळून आल्यासच मास्कचा वापर आवश्यक

दावा - करोनासाठी लस उपलब्ध आहे किंवा लवकरच उपलब्ध होईल
वास्तव - लस उपलब्ध करण्यासाठी संशोधन सुरू आहे. पण अजून यासाठीची लस उपलब्ध झालेली नाही

दावा - करोना इतर रोगांपेक्षा धोकादायक नाही
वास्तव - करोनाचा मृत्यू दर १ टक्के आहे. हा रोग इतर रोगांपेक्षा १० पट घातक आहे.

दावा - १० सेकंदासाठी श्वास रोखू शकत असाल तर तुम्ही सुरक्षित आहात
वास्तव - यशस्वीपणे तुम्ही १० सेकंद श्वास रोखणे आणि करोनाची लागण नसने यांचा आपापसात संबंध नाही

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज