अ‍ॅपशहर

डाएटिंग पिल्स घातक!

कमी वेळेत खूप वजन कमी करण्यासाठी तरुणाई सध्या डाएटिंग पिल्स घेऊ लागली आहे. पण, याचा थेट परिणाम हृदयावर होत असल्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. आजच्या ‘जागतिक हृदय दिना’निमित्त याविषयीच जाणून घेऊ...

शब्दुली कुलकर्णी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Sep 2018, 8:17 pm
कमी वेळेत खूप वजन कमी करण्यासाठी तरुणाई सध्या डाएटिंग पिल्स घेऊ लागली आहे. पण, याचा थेट परिणाम हृदयावर होत असल्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. आजच्या ‘जागतिक हृदय दिना’निमित्त याविषयीच जाणून घेऊ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम diet-pills



झिरो फिगर किंवा सिक्स पॅक अॅब्सपेक्षा तरुणाईमध्ये सध्या वजन कमी करण्याची क्रेझ पाहायला मिळते. तेसुद्धा त्यांच्या इन्स्टंट स्टाइलमध्ये. यासाठी डाएटिंग पिल्सचं सेवन केलं जातं. कमी वेळेत जास्त वजन कमी करण्याचा शॉर्टकर्ट फॉर्म्युला म्हणून डाएटिंग पिल्सकडे पाहिलं जातं. परंतु, यामुळे कमी वयात हृदयविकाराचा झटका येणाऱ्या रुग्णांचं प्रमाण वाढत असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

या पिल्समुळे हृदयविकाराचा झटका, रक्ताच्या गुठळ्या, रक्तवाहिन्या निकामी होणं किंवा रक्तदाबावर परिणाम होत असल्याचं समोर येतंय. फक्त हृदयच नव्हे, तर किडनी आणि स्वादुपिंडावरही या पिल्समुळे गंभीर परिणाम होतात. तसंच याचं सेवन करणाऱ्यांमध्ये हायपर टेन्शनचा त्रासही वाढल्याचं आढळून आलंय. त्यामुळे डाएटिंग पिल्सच्या आहारी न जाता सकस आहार आणि व्यायाम करण्याचा सल्ला तज्ज्ञ मंडळी देत आहेत.


डाएटिंग पिल्सचे प्रकार
० फॅट बर्न करणाऱ्या
० पचनक्रिया सुधारणाऱ्या
० भूक कमी करणाऱ्या

लक्षणं
- हृदयाचे ठोके जलद होणं
- भूक कमी होणं
- अचानक खूप घाम येणं
- तोंडात कोरडेपणा जाणवणं
- हातापायाला कंप सुटणं
- चक्कर येणं
- रक्तदाब वाढणं

००००
झटपट वजन कमी करण्याच्या नादात तरुणाई डाएटिंग पिल्सचं सेवन करते आणि स्वत:च्या शरीराचं नुकसान करुन घेते. याचा परिणाम म्हणजे कमी वयात हृदयविकाराचा झटका किंवा हृदयात रक्ताच्या गुठळ्या होणं हे होऊ शकतं. यापेक्षा तरुण मंडळीनं संतुलित आहार आणि व्यायाम करण्यास प्राधान्य द्यावं.
डॉ. प्रेरणा बावडेकर, आहारतज्ज्ञ
००००
शॉर्टकट हे नेहमीच धोकादायक असतात. हेच सध्या डाएटिंग पिल्सच्या बाबतीत होतंय. कमीत कमी वेळेत अधिकाधिक वजन कमी करण्यासाठी डाएटिंग पिल्स घेतले जातात आणि हृदयविकाराला आयतं आमंत्रण दिलं जातं. याचे दुष्परिणाम झालेल्या २५ ते ३० वयोगटातल्या रुग्णांची संख्या वाढतेय. यापेक्षा नैसर्गिक पद्धतीनं व्यायाम करुन वजन कमी करावं.
डॉ. विजय सुरासे, हृदयविकारतज्ज्ञ

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज