अ‍ॅपशहर

शारिरीक संबंध न ठेवल्यास होतो मानसिक आरोग्यावर परिणाम, काय म्हणतात तज्ज्ञ

Physical Relation Impact Mentally: मानसिक आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि आता त्याबाबत अधिक गंभीरपणा दिसून येतोय. मात्र शारीरिक संबंध न ठेवल्यास, मानसिक परिणाम होतो का? याबाबत अधिक माहिती घेऊया.

Authored byदिपाली नाफडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 May 2023, 11:07 am
मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्याइतकंच महत्त्वाचं आहे. मानसिक आजाराने ग्रस्त असणाऱ्या माणसाला अधिक त्रास होतो हे आता अनेक अभ्यासांवरून सिद्ध झालं आहे. त्यामुळे मानसिक समस्या असतील तर त्याकडे गांभीर्याने पाहिलं जातं. पण मानसिक आजार नक्की का होतात आणि त्याला शारीरिक संबंध न ठेवणंही कारणीभूत ठरतं का?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम how physical relation impact on mental health know from expert
शारिरीक संबंध न ठेवल्यास होतो मानसिक आरोग्यावर परिणाम, काय म्हणतात तज्ज्ञ


तर याचं उत्तर आहे ‘हो’. याबाबत आम्ही मानसशास्त्रज्ञ, डॉ. हेमांगी म्हाप्रोळकर यांच्याकडून अधिक जाणून घेतले. शारीरिक संबंध जर अधिक काळ ठेवले नाहीत तर त्याचा मनावर खरंच परिणाम होतो का आणि अभ्यास याबाबत सांगतो हे या लेखातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (फोटो सौजन्य - iStock)

काय सांगतो अभ्यास?

National Centre Of Biotechnology Information (NCBI) च्या एका अभ्यासानुसार, सांगण्यात आले आहे की, जर अधिक काळ शरीर सेक्शुअल रिलेशन राहिले नाहीत आणि जर तुमची इच्छा असेल तर मात्र तुमच्या मनावर परिणाम होऊ शकतो.

मानसिक आरोग्यासाठी योगासन

फिजिकल रिलेशन आणि स्टडी

या स्टडीमध्ये सांगण्यात आल्यानुसार, १७,७४४ व्यक्तींवर अभ्यास करण्यात आला आहे. या डेटानुसार साधारण १५.२% पुरूष आणि २६.७% महिलांनी साधारण एक वर्ष शारीरिक संबंध ठेवले नाहीत अर्थात कोणाशीही सेक्स केला नाही. तर ८.७% पुरूष आणि १७.५% महिलांनी साधारण ५ वर्षे कोणत्याही प्रकारचे शारीरिक संबंध ठेवलेले नाहीत.

(वाचा - शिळी चपाती फेकून तर देत नाही ना? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे)

मानसिक ताण वाढल्याचे दिसले

स्टडीनुसार सेक्सुशल संबंध हे मानसिक तणावपासून दूर राहण्यास मदत करतात. जर अधिक काळ यापासून दूर राहिले तर माणसांना स्पर्शाचे क्रेविंग होऊ लागते. स्त्री असो वा पुरूष स्पर्शासाठी आसुसतात.

(वाचा - उच्च रक्तदाब ठरतोय ‘सायलेंट किलर’, तरूणांसाठी मृत्यूचा विळखाच, जाणून घ्या रामबाण उपाय)

शारीरिक संबंध नीट नसल्यास नात्यावर परिणाम

२०१५ मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, ज्या जोडीदारांमध्ये शारीरिक संबंध योग्य नसतील त्यांचे नाते लवकर तुटते. नाते तुटण्याचे हे मुख्य कारणही मानले जाते. तसंच अनेकदा शारीरिक संबंध नीट नसल्यामुळे व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होतानाही दिसतात.

(वाचा - काय आहे Hypertensive Heart Disease? यामुळे संभवतो हार्ट फेल्युअरचा धोका)

Anxiety साठी कारणीभूत

तसंच डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे, योग्य पद्धतीने शारीरिक संबंध राहात नसतील तर स्त्री अथवा पुरूषांमध्ये मानसिक तणाव वाढून त्याचे रूपांतर Anxiety मध्येही होण्याची शक्यता असते. ही बाब गंभीर असून याकडे वेळीच लक्ष द्यायला हवे. डॉ. हेमांगी म्हाप्रोळकर यांच्या सांगण्याप्रमाणे जर शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा असेल आणि ती पूर्ण होत नसल्यास, मानसिक त्रास उद्भवू शकतात.

मूडवर होतो परिणाम

आपल्या आवडत्या व्यक्तीसह शारीरिक संबंध ठेवता येत नसेल अथवा काही कारणाने तसे घडत नसेल तर विशेषतः महिलांमध्ये चिडचिडेपणा अधिक वाढतो आणि त्यांचा मूड सतत या कारणामुळे बदलत राहातो. ज्याचा नात्यावर अधिक वाईट परिणाम घडताना दिसतो. सेक्समुळे Endorphin आणि Oxytocin नावाचे हार्मोन रिलीज होतात जे शरीराला रिलॅक्स ठेवतात. मात्र हे होत नसल्यास चिडचिडेपणा वाढतो.

सेक्शुअल टॉकमुळे मिळतो आनंद

नात्यात अशा पद्धतीचे बोलणे महत्त्वाचे ठरते. Centre Of Sexual And Reproductive Health च्या एका सर्व्हेनुसार, सेक्शुअल टॉकमुळे एक वेगळा आनंद मिळतो आणि यामुळे मानसिक ताण कमी होऊन नात्यातील संबंध सुधारण्यासही मदत मिळते.

लेखकाबद्दल
दिपाली नाफडे
"दिपाली नाफडे प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल मीडियामधील मराठी पोर्टल्सचा १५ वर्षांचा अनुभव असून पत्रकार आणि कंटेट रायटर म्हणून कार्यरत. न्यूज आणि नॉन-न्यूज दोन्ही मीडिया क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव असून कोणत्याही विषयावर लिखाणाची जाण ही अनुभवातून आलेली आहे आणि याशिवाय विविध विषयांसंबंधी व्हिडिओदेखील केले आहेत. मनोरंजन, फिचर स्टोरीज, लाइफस्टाईल, ब्युटी, फॅशन, आरोग्य, फूड आणि सेलिब्रेटींची मुलाखत यासंबंधी लिखाण आणि व्हिडिओ दोन्हीमध्ये पारंगत. लोकांना वाचनात गुंतवून ठेवेल आणि माहितीपूर्ण असे लेख लिहिणे यावर नेहमीच भर देण्याचा अँगल. लेख असो अथवा डिजीटल व्हिडिओ असो प्रत्येक गोष्टीत बांधिलकी जपत योग्य आणि महत्त्वपूर्ण माहिती पोहचविण्याची जबाबदारी आणि योग्य दर्जा देत काम केले आहे. टीम लीडर म्हणून जबाबदारी गेल्या ५ वर्षांपासून पेलली असून स्वतःसह टीमचा विकास कसा होईल याकडे अधिक लक्ष पुरविले आहे. व्यावसायिक कामाव्यतिरिक्त मित्रमैत्रिणींसह वेळ घालवायला आणि जेवण बनवायला आवडते."... आणखी वाचा

महत्वाचे लेख