अ‍ॅपशहर

थकवा होईल छूमंतर

दिवाळीच्या काळात मनसोक्त फराळाचा आस्वाद घेणं, मित्र परिवाराच्या भेटीगाठी अशा सगळ्या धुमशानामुळे थकवा येणं, साहाजिक आहे. जर तुम्हाला पण थकवा जाणवत असेल तर खालील उपाय जरुर करुन पाहा.

Maharashtra Times 10 Nov 2016, 12:04 am
दिवाळीच्या काळात मनसोक्त फराळाचा आस्वाद घेणं, मित्र परिवाराच्या भेटीगाठी अशा सगळ्या धुमशानामुळे थकवा येणं, साहाजिक आहे. जर तुम्हाला पण थकवा जाणवत असेल तर खालील उपाय जरुर करुन पाहा.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम how to deal with fatigue
थकवा होईल छूमंतर


स्पा ट्रीटमेंट
दिवाळीनंतर थकवा दूर करण्यासाठी तुम्ही स्पा ट्रीटमेंट घेऊ शकता, याने तुमचा संपूर्ण थकवा दूर होईल.

फळांचा रस
शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यासाठी फळांचा रस फायदेशीर ठरतो. जास्तीत जास्त पाणी पिण्यावर भर द्या. जेव्हा शक्य असेल तेव्हा गरम पाणी प्यावं.

व्यायाम
दिवाळी नंतर थकवा घालवण्यासाठी सकाळी उठून व्यायाम करा आणि कमीत-कमी अर्धा तास चाला. व्यायाम केल्याने वाढलेल्या रक्तप्रवाहामुळे सेरोटोनिनसारख्या हॉर्मोनचं उत्सर्जन केलं जातं आणि मूड आनंदी होतो.

संगीत
थकवा जाणवला की तुम्ही संगीत ऐकू शकता याने तुम्हाला काम करण्यास स्फूर्ती मिळेल आणि ताजेतवाणं वाटेल.

ध्यानधारणा
ध्यानधारणा केल्याने मानसिक स्वास्थ्य सुधारतं. सकाळी लवकर उठून ध्यानधारणा करावी.

ग्रीन टी
सकाळी चहा किंवा कॉफी पिण्यापेक्षा तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता. यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल आणि आरोग्यासाठी हा उत्तम पर्याय ठरतो.

संतुलित आहार
थकवा घालवण्यासाठी सकाळी उठून मध आणि लिंबूपाणी घेऊ शकता. याशिवाय तुम्ही संतुलित आणि हलका आहार घेणं, अत्यंत आवश्यक असतं.
संकलन- सस्मित फेगडे, कॉलेज क्लब रिपोर्टर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज