अ‍ॅपशहर

​ कशाला चिंतेची बात?

चिंता, काळजी या गोष्टी सध्याच्या तणावात्मक जीवनशैलीच्या अविभाज्य भाग आहेत. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचा पिच्छा काही या चिंतेने सोडलेला नाही. पण तुम्ही याचा सखोल विचार केलात तर काही चुकीच्या सवयींमुळे आपल्याला सतत काळजी जाणवत असते. नेमक्या या चुकीच्या सवयी कोणत्या, याविषयी...

Maharashtra Times 12 Jul 2017, 12:07 am
डॉ. सागर मुंदडा, एमबीबीएस, एमडी,
महाराष्ट्र टाइम्स.कॉम how to overcome anxity
​ कशाला चिंतेची बात?

मेंदू-मनोविकार व व्यसनमुक्तीतज्ज्ञ

चिंता, काळजी या गोष्टी सध्याच्या तणावात्मक जीवनशैलीच्या अविभाज्य भाग आहेत. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचा पिच्छा काही या चिंतेने सोडलेला नाही. पण तुम्ही याचा सखोल विचार केलात तर काही चुकीच्या सवयींमुळे आपल्याला सतत काळजी जाणवत असते. नेमक्या या चुकीच्या सवयी कोणत्या, याविषयी...
दिवसेंदिवस स्पर्धात्मक जागाला सामोरं जाताना ताण-तणाव अन् इतर मनोविकारही आपल्या जीवनाचा एक भाग झालेत. ताणामुळे अगदी कमी वयात नैराश्य येणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे व्यायाम, योग व ध्यानधारणा करुन तणावमुक्त जीवनशैली जगण्याचा सर्वांचा मानस असतो. तरीही कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चिंता, काळजी आपल्याला सतावत असते. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांची चिंता, काळजी काही पिच्छा सोडत नाही. ‘अभ्यास कसा होईल?’, ‘परीक्षेत चांगले गुण येतील ना?’ अशी लहान मुलांना तर ‘मला कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल?’, ‘माझं पुढे करिअर कसं होईल’, अशा नानाविविध चिंता या तरुण वयात भेडसावत असतात. तरुणाईला तर अनेक कारणांमुळे ताणाला सामोरं जावं लागतं. पण तरुण मंडळींनी आपल्या सवयींमध्ये काही बदल केल्यास नक्कीच फरक पडू शकतो. तरुण पिढीच्या काही चुकीच्या सवयी आणि त्याला पर्याय यांचा अभ्यास आपण आजच्या लेखातून करणार आहोत.
•झोपण्याच्या चुकीच्या सवयी
ताण जाणवण्याला सर्वात जास्त जबाबदार गोष्ट असेल तर ती म्हणजे अपुरी झोप. रात्री-अपरात्री फोनवर चॅटिंग करणं किंवा लॅपटॉपवर चित्रपट बघत बसणं अशा चुकीच्या सवयी अनेकांना असतात. या सगळ्यामध्ये झोप ही बाब प्राधान्यक्रमावर कधीच नसते. परिणामी, याचा शारीरिक व मानसिक आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होतो.
पर्याय- रात्रीच्या वेळी मोबाइल, लॅपटॉप यांसारख्या उपकरणांना स्वत:पासून दूर ठेवा. त्याशिवाय रात्री झोपण्यापूर्वी रोजनीशी लिहिण्याची सवय लावावी.
•मोबाइलला ठेवा दूर
तंत्रज्ञानाने जीवशैलीचा दर्जा उंचावला आहे हे खरंय, पण त्यामुळे ताण, चिंता हेही वाढतंय. सोशल मीडियाच्या अतिवापराचा मनावर परिणाम होतो, हे अनेक संशोधनाअंती सिद्ध झालंय.
पर्याय- कंटाळा घालवण्यासाठी मोबाइलमध्ये खेळत बसण्यापेक्षा तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात, त्या करण्यास प्राधान्य द्या. तसंच मोबाइल वापरण्यासाठी काही ठराविक वेळ राखून ठेवा किंवा जास्त मोबाइल न वापरण्याचा नियम स्वत:ला घालून घ्या.
•कॉफीचं अतिसेवन नको
झोप उडवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी कॉफीचं अतिसेवन करणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे. पण याच कॉफीमधील कॅफेनमुळे पॅनिक अॅटॅक येण्याची शक्यता असते. तसंच कॉफीमुळे शरीरातील पाण्याचं प्रमाणही कमी होतं.
पर्याय- दिवसातून एक कपच कॉफी पिण्याची सवया स्वत:ला लावा. जमल्यास कॉफीपेक्षा काळा चहा पिण्यास प्राधान्य द्या.
संकलन- शब्दुली कुलकर्णी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज