अ‍ॅपशहर

आहारात मैदा नकोच

रोजच्या आहारात मैद्याचा समावेश असेल, तर तो लगेच नुकसान करेल असं नाही. पण मैद्याचे अनेक साइड इफेक्ट्स असतात. ते शरीराला अपायकारक असल्याचं समोर आलं आहे. मैद्याचे आणखी काही दुष्परिणाम...

Maharashtra Times 21 Sep 2016, 12:12 am
रोजच्या आहारात मैद्याचा समावेश असेल, तर तो लगेच नुकसान करेल असं नाही. पण मैद्याचे अनेक साइड इफेक्ट्स असतात. ते शरीराला अपायकारक असल्याचं समोर आलं आहे. मैद्याचे आणखी काही दुष्परिणाम...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम illeffects of having maida
आहारात मैदा नकोच

लठ्ठपणा वाढवतो
मैद्याचे जास्त आणि वारंवार पदार्थ खाल्ल्यानं वजन वाढणं सुरु होतं. अंगी लठ्ठपणा येतो. इतकंच नाही, तर यामुळे कोलेस्टरॉलचं प्रमाणही वाढतं. रक्तातील ट्रायग्ल‌सिराइडलाही यामुळे चालना मिळते. तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नांत असाल, तर मैदा खाणं कायमचं बंद करावं.
पोटासाठी वाईट
मैदा पोटासाठी वाईट असतो. मैद्यात फायबर नसल्यानं पोट नीट साफ होत नाही.
प्रोटिनची कमतरता
मैद्यात ग्लूटन असतं. ते फूड अॅलर्जी तयार करतं. ग्लूटन जेवणाला लवचिक करून त्याला मऊ टेक्स्चर देतो. त्याचे दुष्परिणाम होतात. तेच गव्हाच्या पिठात मोठ्या प्रमाणात फायबर आणि प्रोटिन असतं. मैद्यात या दोन्ही बाबी नसतात.
हाडं होतात कमकुवत
मैदा तयार करताना यातील प्रोटिन काढलं जातं. परिणामी, मैदा अॅसिडिक होतो. त्याचा परिणाम हाडांवर होतो. हाडांतील कॅल्शियम मैदा शोषून घेतो. त्यामुळे हाडं कमकुवत होतात.
हृदयाचा त्रास
रक्तातील साखर वाढते, तेव्हा रक्तात ग्लुकोज गोळा होऊ लागतं. यामुळे शरीरात केमिकल रिअॅक्शन होते आणि कॅटरॅक्टपासून हृदयाचा त्रास ओढावू शकतो.
अन्यही आजारांचा धोका
मैदा नियमित खाल्ल्यानं शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते. वारंवार आजारी पडण्याची शक्यता बळावते. यापासून बचाव करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मैदा एकूणात टाळलेलाच बरा! तसंच, मैद्याचे पदार्थ पचायला जड असल्यानं बद्धकोष्ठतेचा त्रास होतो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज