अ‍ॅपशहर

व्यायाम करा जपून!

उत्तम आरोग्य मिळवण्याच्या प्रयत्नात आपण नेमक्या कोणत्या चुका करतो आणि योग्य काय यावर एक कटाक्ष टाकूयात.

Maharashtra Times 26 Apr 2017, 3:10 am
उत्तम आरोग्य मिळवण्याच्या प्रयत्नात आपण नेमक्या कोणत्या चुका करतो आणि योग्य काय यावर एक कटाक्ष टाकूयात.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम important tips for exercise
व्यायाम करा जपून!


रोजच्या धकाधकीच्या जीवनातही उत्तम आणि सुदृढ आरोग्य मिळवण्याच्या दृष्टीने आपण सतत प्रयत्नशील असतो. पण त्यासाठी आपण अवलंबलेले बरेच प्रकार आपल्या शरीराला ईजाही पोहोचवू शकतात, याची आपल्याला जाणीवही नसते आणि मग अशाच काही चुका कालांतराने विविध आजारांच्या रुपात फारच त्रासदायक ठरतात. म्हणूनच उत्तम आरोग्य मिळवण्याच्या प्रयत्नात आपण नेमक्या कोणत्या चुका करतो आणि योग्य काय यावर एक कटाक्ष टाकूयात.

चूक- शरीराच्या कोणत्याही ठराविक अवयवात जलद आणि जास्त ऊर्जा मिळवण्याच्या हव्यासापोटी, त्याच एका ठराविक अवयवाशी निगडीत व्यायाम प्रकार दररोज करणं.

बरोबर- दररोज शरीराच्या त्याच एका ठराविक अवयवाचा व्यायाम अधिक काळ केल्यास त्यातील स्नायूंना इजा पोहोचू शकते. याचा थेट परिणाम त्या अवयवाच्या हालचालीवर होऊन कालांतराने तो भाग निकामीही होऊ शकतो. म्हणूनच अशा प्रकाचे धोके टाळण्यासाठी योग्य प्रशिक्षण असावं किंवा प्राथमिक पातळीवर एक दिवस आड करून त्या अवयाचा व्यायाम करावा.

चूक- पोटाचा आकार कमी करण्यासाठी सतत पोटाचे व्यायाम करणं

बरोबर- लठ्ठपणा किंवा पोटाचा वाढलेला आकार ही समस्या साधारण झाली आहे. योग्य व्यायाम आणि नीट आहार घेतल्यास हा लठ्ठपणा कमी होतो. परंतु शरीरातील इतर अवयवांतील स्नायूंनप्रमाणे पोटाच्या स्नायूंनाही पुरेशा आरामाची आवश्यकता असते. म्हणूनच पोटाचा वाढता आकार कमी करण्यासाठी पोटाच्या व्यायामाकरता आठवड्यातून एक किंवा दोन दिवस ठरवावेत आणि त्यानुसारच व्यायाम करावा.

चूक- व्यायाम पूर्व तयारी किंवा वॉर्म-अप ची टाळाटाळ करणं

बरोबर- व्यामाच्या चुकीच्या पद्धतींमुळे किंवा शरीरातील वेदनादायक अवयवांना झालेला त्रास टाळण्यासाठी स्नायू ताणण्याचे (स्ट्रेचिंग) किंवा वॉर्म-अप एक उत्तम उपाय आहे. यामुळे फक्त शरीरातीलच नाही तर मनावरील ताण कमी होण्यासही मदत होते. ज्यामुळे प्रसन्न वाटतं.

चूक- व्यायाम करताना गरजेपेक्षा अधिक शक्ती वापरणं

बरोबर- व्यायाम करताना शरीराकडून मिळणारे संकेत आपण ओळखले पाहिजेत. (उदा. हाताचा व्यायाम करताना हात प्रमाणापेक्षा अधिक दुखू लागले, तर तो व्यायाम थांबवावा.) व्यायाम केल्यानंतर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर तुम्ही करत असलेल्या व्यायामाच्या काळात बदल करणं आवश्यक असतं. कारण व्यायाम करताना तुम्ही गरजेपेक्षा अधिक ताकदीचा वापर केला आहे आणि आता शरीरात अधिक व्यायाम करण्यासाठी ऊर्जा नाही हा त्यामागचा संकेत असतो. म्हणून व्यायाम आणि व्यायामाच्या वेळेत योग्य ते बदल करावेत.

चूक- व्यायाम करताना श्वसनाच्या पद्धती

बरोबर- श्वसन हा उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असा महत्त्वाचा पैलू आहे. विशेषतः योगा आणि वजन कमी करण्याच्या व्यायामांत त्याला फार महत्त्व आहे. उदा. वजन कमी किंवा वाढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्याही व्यायाम प्रकारात आपण योग्य श्वसन प्रक्रिया असावी. म्हणजेच स्नायूंवरील ताण वाढवताना श्वास तर ताण कमी करताना उच्छवास घ्यावा.

शब्दांकन- अजय उभारे,

कॉलेज क्लब रिपोर्टर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज