अ‍ॅपशहर

International Men's Day: Sperm काऊंट कसा वाढवावा? ५ गोष्टी ठरतील जालीम उपाय, खाताच १०० स्पीडने वाढतील शुक्राणू

Tips to increase low sperm count: जगभरात आज १९ नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातो. नुकताच पुरुषांच्या आरोग्याबाबतचा एक अभ्यासही समोर आला आहे. ज्यामध्ये पुरुषांची प्रजनन क्षमता झपाट्याने कमी होत असल्याचे समोर आले आहे. ज्यामुळे शुक्राणूंची संख्या खूप कमी झाली आहे.

Authored byदक्षता समीर घोसाळकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Nov 2022, 11:46 am
तुमच्या आहाराचा शुक्राणूंवर किंवा शुक्राणूंच्या गुणवत्तेवर थेट परिणाम होतो हे तुम्हाला माहीत आहे का? ह्युमन रिप्रोडक्शन अपडेट या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, गेल्या 60 वर्षांत पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या 50% कमी झाली आहे. यासोबतच ३० वर्षाखालील पुरुषांचा प्रजनन दर जागतिक स्तरावर १५% ने कमी झाला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम international mens day 2022 know how to increase sperm count direct from food
International Men's Day: Sperm काऊंट कसा वाढवावा? ५ गोष्टी ठरतील जालीम उपाय, खाताच १०० स्पीडने वाढतील शुक्राणू


फंक्शनल न्यूट्रिशनिस्ट आणि सीईओ आणि iThrive च्या संस्थापक, मुग्धा प्रधान सांगतात की, पुरुषाच्या शुक्राणूंची एकाग्रता, गतिशीलता आणि आकार त्याची प्रजनन क्षमता निर्धारित करतात. खराब जीवनशैली हे स्पर्मच्या कमी होण्याचे प्रमुख कारण आहे. जर तुम्ही चुकीचाआहार आणि जास्त प्रमाणात मद्यपान करत असाल तर तुमच्या शुक्राणूंची गुणवत्ता आणि प्रमाण या दोन्हींवर परिणाम होतो. ज्यामुळे तुमची बाप होण्याची शक्यता कमी होते. अशा परिस्थितीत, येथे सांगितलेले उपाय तुम्हाला शुक्राणू तंदुरुस्त ठेवण्यास मदत करू शकतात. (फोटो सौजन्य - टाइम्स ऑफ इंडिया)

​विटामिन डीचे सेवन वाढवा

व्हिटॅमिन डी पुरुषांच्या प्रजननासाठी फायदेशीर आहे. हे एक उत्तेजक आहे जे टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवण्याचे काम करते. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की व्हिटॅमिन डीची कमतरता असलेल्या पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचे अपुरे उत्पादन होण्याची शक्यता असते. अशावेळी व्हिटॅमिन डी पुरेशा प्रमाणात घ्या.

(वाचा - Men's Day : केस गळणं वंध्यत्वाचं मुख्य लक्षणं, अजिबात करू नका दुर्लक्ष 'या' पदार्थाला करा हद्दपार ))

अश्वगंधा

पुरुषांसाठी अश्वगंधा खूप फायदेशीर आहे. पुरुषांमध्ये कमी प्रजननक्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी हा सर्वोत्तम नैसर्गिक उपायांपैकी एक आहे. दररोज पाच ग्रॅम अश्वगंधा सेवन केल्याने शुक्राणूंची संख्या आणि गतिशीलता वाढू शकते.

(वाचा - Weight Loss Story : शशांकने ७ महिन्यात ३२ किलो वजन केलं कमी, ५ गोष्टी कमी केल्या आणि फरक अनुभवला)

​झिंक

झिंक पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या वाढवण्याचे काम करते. म्हणूनच स्त्रियांपेक्षा पुरुषांना त्याची जास्त गरज असते. याव्यतिरिक्त, ते हार्मोन्सचे नियमन करते, जे पुरुषांच्या लैंगिक, प्रोस्टेट आणि टेस्टोस्टेरॉनच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. झिंकची कमतरता शुक्राणूंची संख्या कमी होण्याशी संबंधित आहे आणि शुक्राणूंमध्ये विकृती निर्माण करू शकते.

(वाचा - थायरॉइड आणि डायबिटिजचं अस्तित्वच नष्ट करतील 'ही' हिरवी पानं, Deepika च्या न्यूट्रिशनिस्टने सांगितला रामबाण उपाय))

​सोया कमी खा

सोया शुक्राणू कमी करण्याचे काम करते. काही अभ्यासांनी असेही सुचवले आहे की ज्या पुरुषांनी दररोज जास्त किंवा जास्त सोयाचे सेवन केले होते त्यांची प्रजनन क्षमता कमी होते.

(वाचा - शरीरातलं रक्त, पाणी सुकवून टाकतात हे १५ पदार्थ, यामुळेच कमी वयात होतात हार्ट अटॅक-कॅन्सरसारखे जीवघेणे आजार)

​शिलाजीत

शिलाजीत पुरूषांमधील नपुंसकता रोखण्यासाठी योग्य सप्लीमेंट आहे. पुरूषांच्या स्पर्मचे प्रमाण कमी झाले तर प्रजननामध्ये अडथळे निर्माण होऊ शकते. जर तुमच्या शुक्राणूंची संख्या कमी होत असेल, तर शिलाजीतचे दिवसा सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

वाचा - इन्सुलिन सारखंच काम करतात भिजवलेले अक्रोड, हाय शुगर आणि घाणेरड कोलेस्ट्रॉल एका झटक्यात करतं कमी)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ञांशी संपर्क साधावा.

लेखकाबद्दल
दक्षता समीर घोसाळकर
"दक्षता या क्षेत्रातील 12 वर्षांचा अनुभव असलेले एक व्यावसायिक मीडिया अनुभवी आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात प्रिंट मीडियामध्ये केली, जिथे तिने विविध बातम्या कव्हर केल्या. त्यानंतर तिने इलेक्ट्रॉनिक मीडियाचा अनुभव घेताल. जिथे तिने अतिथी समन्वयक, संशोधक आणि इनपुट सहाय्यक निर्माता म्हणून काम केले. दक्षता नंतर वेब मीडियावर गेली, जिथे तिने वरिष्ठ उपसंपादक पदावर काम केले. येथे, तिने लेख लिहिणे आणि संपादित करण्याचे काम केले. तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या बातम्यांचे नियोजन करणे. दक्षताने मराठी मनोरंजन, बॉलीवूड, सोशल स्टोरीज, लाइफस्टाइल आणि लिस्टिकल स्टोरीज अशा विविध विषयांचे कव्हरेज केले आहेत. सध्या, दक्षता लाईफस्टाईल या सेक्शनमध्ये जीवनशैली, सामान्य कथा आणि आरोग्य विभाग हाताळत आहे. गेल्या 11 महिन्यांपासून दक्षता या विभागात काम करत आहे. तिच्या मोकळ्या वेळेत, तिला ब्लॉग लिहिणे, पुस्तके वाचणे आणि चित्रपट पाहणे आवडते. तिची निपुणता आणि मीडियाबद्दलची आवड तिला कोणत्याही संस्थेसाठी मनापासून काम करण्यास मदत करते."... आणखी वाचा

महत्वाचे लेख