अ‍ॅपशहर

विक्रम गोखले यांच्या निधनाला हा आजार कारणीभूत? ६ महत्वाच्या लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Marathi Veteran Actor Vikram Gokhale Passed Away : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झालं. २० दिवसांपासून विक्रम गोखले रूग्णालयात उपचार घेत होते. आज दुपारी विक्रम गोखले यांनी अखेरचा श्वास घेतला.

Authored byदक्षता समीर घोसाळकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Nov 2022, 9:32 pm
मराठी रंगभूमी, सिनेमे, हिंदी सिनेसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी आज वयाच्या ७७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या २० दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज १ वाजून ४५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विक्रम गोखले यांना सुरूवातीला श्वसनाचा त्रास जाणवला म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या पोटात पाणी साचलं होतं ज्याला जलोदरचा त्रास असं म्हणतात.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम marathi actor vikram gokhale death reason know the symptoms of multiple organ system failure
विक्रम गोखले यांच्या निधनाला हा आजार कारणीभूत? ६ महत्वाच्या लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष


यानंतर त्यांचे यकृतही निकामी झाले. हळूहळू त्यांचे एक एक अवयव निकामी होऊ लागले. याला मेडिकल भाषेत मल्टिपल ऑर्गन सिस्टीम फेल्युअर म्हटलं जातं. शरीरातील एक एक अवयव निकामी होताना संकेत मिळत असतात. या संकेतांकडे दुर्लक्ष अजिबात करू नये. शरीरातील कोणत्याही बदलाकडे नजरअंदाज करू नका. त्यामुळे या आजाराबद्दल सगळी माहिती डॉ. प्रशांत बोराडे, क्रिटिकल केअर विभागाचे प्रमुख- ग्लोबल हॉस्पिटल, परेल, मुंबई यांनी दिली आहे. (फोटो सौजन्य - टाइम्स ऑफ इंडिया)

​काय आहे नक्की हा आजार?

जेव्हा शरीरात गंभीर दुखापत किंवा संसर्गामुळे होणारा दाह यामुळे दोन किंवा किंवा अधिक अवयव प्रणालींमध्ये तंत्र बिघडते तेव्हा त्याला अवयव निकामी म्हणतात. मल्टिपल ऑर्गन सिस्टीम फेल्युअर, ज्याला मल्टीपल ऑर्गन डिसफंक्शन सिंड्रोम (MODS) असेही म्हणतात. हे संबंधीत रुग्णासाठी अत्यंत घातक ठरू शकते तसेच ही परिस्थिती जीवघेणा देखील ठरु शकते.

यामुळे रोगप्रतिकारक शक्तीसह संपूर्ण शरीरावर विपरीत परिणाम होतो.हा सिंड्रोम संसर्ग, दुखापत, हायपरफ्यूजन आणि हायपरमेटाबोलिझममुळे होतो. या परिस्थितीत, साइटोकिन्स पेशींची निर्मिती महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. यामध्ये पेशींना माहिती पाठवून रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय ठेवली जाते. शरीरात ब्रॅडीकिनिन प्रथिनांचे प्रमाण जास्त असतानाही अनेक अवयव निकामी होऊ शकतात.

(वाचा - सतत सर्दी होतेय तर आहारात 3 मसाल्यांचा आवर्जून करा समावेश, हृदयाचे आजार-हाय ब्लड शुगरसह १० आजार होतील हद्दपार)

​आजाराची लक्षणे कोणती?

अशा स्थितीत शरीरातील रक्ताभिसरणावर परिणाम होऊन शरीरात सूज येऊ लागते आणि रक्ताच्या गुठळ्याही तयार होऊ लागतात. थंडी वाजून येणे, स्नायू दुखणे, लघवी न होणे, श्वास घेण्यास त्रास, त्वचा निस्तेज होणे ही त्याची लक्षणे आहेत.फुफ्फुसे, हृदय, किडनी, यकृत, मेंदू, रक्तपुरवठ्यावर प्रामुख्याने याचा परिणाम होतो.

(वाचा - Weight Loss Drink: पोटावरची लटकणारी चरबी एका झटक्यात करेल कमी 'हे' ड्रिंक्स, केस गळणे डायबिटीज कंट्रोलमध्ये)

आजारावर इलाज काय?

संशोधनानुसार, देशात आणि जगात अवयव निकामी झालेल्या रुग्णांवर उपचार अजूनही मोठ्या प्रमाणात प्रभावी आहेत. गेल्या 20 वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर रुग्णाच्या मृत्यू दराचा परिणाम खूपच कमी झाला आहे. जर एखाद्या व्यक्तीने त्याची लक्षणे वेळीच ओळखली तर तो स्वतःची तपासणी करू शकतो. जर तुम्हाला स्वतःमध्ये ही लक्षणे दिसली तर विलंब न करता तुमच्या डॉक्टरांशी बोला. त्यावर वेळीच उपचार करून तुम्ही स्वतःचे मोठ्या प्रमाणात संरक्षण करू शकता.

(वाचा - फुटबॉल मॅच दरम्यान का थुंकतात खेळाडू? याचा थेट संबंध आरोग्याशी)

​अशावेळी काय कराल?

सध्यातरी अवयवांच्या बिघडलेल्या कार्यावर उपचार करू शकणारे कोणतेही औषध किंवा थेरपी नाही. ज्या अवयवांचे कार्य बिघडलेले आहे त्यांना आधार देणे हा सर्वोत्तम उपचार आहे, औषधे किंवा अवयव सहाय्य करणारी उपकरणे जसे की मूत्रपिंडासाठी डायलिसिस, फुफ्फुसांसाठी मेकॅनिकल वेंटीलेशन, हृदय व फुफ्फुसासाठी ईसीएमओ (एक्स्ट्रा कॉरपोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन) इ. प्राथमिक स्थितीपर्यंत आधाराची आवश्यकता भासू शकते. संसर्ग, शॉक किंवा जखमांवर पूर्णपणे उपचार केले जातात.

एकाधिक अवयव निकामी होणे ही एक मंद आणि आव्हानात्मक प्रक्रिया असू शकते. मल्टीपल ऑर्गन डिसफंक्शन सिंड्रोमचा उपचाराकरिता वेळीच निदान महत्त्वाचे आहे. कोणत्याही रुग्णालयातील आयसीयू उपचार हा सामान्यतः उपचार आणि पुनर्प्राप्तीचा पहिला टप्पा ठरतो. याकरिता रुग्णाला अनेक आठवडे आणि महिने मदतीची आवश्यकता असते जसे की फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, आहारतज्ञ आणि श्वसन थेरपिस्ट तज्ज्ञांचे नियमित मार्गदर्शनाची गरज असते.

(वाचा - ३७ वर्षीय रोनाल्डोने कसा कमावला २० वर्षांच्या तरूणांना लाजवेल असा फिटनेस? जाणून घ्या हेल्थ-वर्काऊट टिप्स)

लेखकाबद्दल
दक्षता समीर घोसाळकर
"दक्षता या क्षेत्रातील 12 वर्षांचा अनुभव असलेले एक व्यावसायिक मीडिया अनुभवी आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात प्रिंट मीडियामध्ये केली, जिथे तिने विविध बातम्या कव्हर केल्या. त्यानंतर तिने इलेक्ट्रॉनिक मीडियाचा अनुभव घेताल. जिथे तिने अतिथी समन्वयक, संशोधक आणि इनपुट सहाय्यक निर्माता म्हणून काम केले. दक्षता नंतर वेब मीडियावर गेली, जिथे तिने वरिष्ठ उपसंपादक पदावर काम केले. येथे, तिने लेख लिहिणे आणि संपादित करण्याचे काम केले. तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या बातम्यांचे नियोजन करणे. दक्षताने मराठी मनोरंजन, बॉलीवूड, सोशल स्टोरीज, लाइफस्टाइल आणि लिस्टिकल स्टोरीज अशा विविध विषयांचे कव्हरेज केले आहेत. सध्या, दक्षता लाईफस्टाईल या सेक्शनमध्ये जीवनशैली, सामान्य कथा आणि आरोग्य विभाग हाताळत आहे. गेल्या 11 महिन्यांपासून दक्षता या विभागात काम करत आहे. तिच्या मोकळ्या वेळेत, तिला ब्लॉग लिहिणे, पुस्तके वाचणे आणि चित्रपट पाहणे आवडते. तिची निपुणता आणि मीडियाबद्दलची आवड तिला कोणत्याही संस्थेसाठी मनापासून काम करण्यास मदत करते."... आणखी वाचा

महत्वाचे लेख