अ‍ॅपशहर

Foods Not To Store In Fridge: कितीही कडक उन्हाळा असला तरी ‘हे’ पदार्थ फ्रीजमध्ये ठेवू नका!

काही पदार्थ हे उन्हाळाच काय तर कोणत्याच ऋतूमध्ये फ्रीजमध्ये ठेऊ नयेत. तर जाणून घ्या मंडळी हे पदार्थ चुकून जरी फ्रीजमध्ये ठेवले तर काय होतं? आणि हे पदार्थ फ्रीजमध्ये का ठेऊ नयेत?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Jun 2020, 3:36 pm
उन्हाळा आला की कोणत्याही गृहिणीला सगळ्यात मोठी चिंता असते ती म्हणजे खराब होणाऱ्या पदार्थांची! उष्णता जास्त असल्याने पदार्थांचे आयुष्यमान कमी होते आणि ते लवकर सडू लागतात. अशावेळी मग एकच पर्याय उरतो तो म्हणजे हे पदार्थ फ्रीज मध्ये ठेवणे. फ्रीजमध्ये तापमान कमी असल्याने त्यात हे पदार्थ नीट राहतील असेल आपल्याला वाटते. पण मंडळी ही गोष्ट सर्व पदार्थांना लागू होईलच असे नाही. काही पदार्थ असे आहेत जे तुम्ही कितीही उन्हाळा असाल तरी अजिबात फ्रीज मध्ये ठेवू नयेत. या पदार्थांना उन्हाळ्यात फ्रीज मध्ये ठेवल्यास उलट ते लवकर खराब होतात, म्हणून त्यांना बाहेरचं ठेवावे. चला जाणून घेऊया या विचित्र सत्याबद्दल आणि पाहूया कोणते आहेत हे पदार्थ!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम never keep these foods in fridge during summer in marathi
Foods Not To Store In Fridge: कितीही कडक उन्हाळा असला तरी ‘हे’ पदार्थ फ्रीजमध्ये ठेवू नका!



कांदा

कांदा हा कधीच फ्रीज मध्ये ठेवू नये. उघड्यावर योग्य रूम टेम्परेचर मध्ये कांदा सुस्थितीत राहतो आणि जास्त वेळ टिकतो. फक्त एकच अट हणजे यावर सूर्याची थेट किरणे पडू देऊ नयेत. अंधाऱ्या खोलीत खेळकर हवा असणाऱ्या जागेत कांदे ठेवावेत. कांद्यात जास्त आर्द्रता असल्याने फ्रीजच्या थंड वातावरणात ते अधिक जलद गतीने खराब होतात. जर तुम्हाला कापलेला कांदा स्टोर करायचा असेल तर एका हवाबंद डब्यात तो कांदा ठेवून मग तो डब्बा फ्रीजमध्ये ठेवावा.

(वाचा :- Immunity Booster Drink : रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी रोज चहात टाका ‘या’ २ गोष्टी!)

बटाटा

बटाटा म्हणजे आपल्या रोजच्या आहारातील अविभाज्य भाग होय. बटाटा हा बाहेरच्या वातावरणात खूप दिवस राहतो आणि लवकर खराबही होत नाही. कारण यामध्ये स्टार्च खूप असते आणि म्हणून उघड्या जागेत खेळती हवा असलेल्या जागेत ठेवलेले बटाटे जास्त वेळ चांगले राहतात. जर तुम्ही बटाटा फ्रीज मध्ये ठेवला तर त्यातील स्टार्च फ्रीजच्या थंड वातावरणात रासायनिक रुपात दुभंगते. यामुळे स्टार्चची चव बदलते आणि बटाटे खायला चांगले लागत नाहीत.

(वाचा :- Health Benefits of Juice : रोज सकाळी प्या १ ग्लास डाळींबाचा ज्युस, होतील ‘हे’ फायदे!)

टरबूज

टरबूज फ्रीज मध्ये ठेवल्यावर सगळ्यात मोठी समस्या ही निर्माण होते की याच्यासोबत फ्रीज मध्ये इतर जे काही पदार्थ असतील त्यांनाही टरबूजाचा वास येऊ लागतो. याशिवाय यातील अँटीऑक्सीडेंटचा प्रभाव सुद्धा कमी होत जातो आणि यातील पोषकता निघून जाते. दुसरी गोष्ट ही की टरबूज जास्त दिवस फ्रीज मध्ये ठेवल्याने त्याची नैसर्गिक चव निघून जाते. या ऐवजी टरबूज काही वेळ पाण्यात भिजवून ठेवणे उत्तम!

(वाचा :- नियमित दूध प्यायल्याने आरोग्यास होतात ‘हे’ लाभ!)

लसूण

लसूण तुम्हाला जास्त दिवस चांगले राखायचे असतील तर त्यांना कधीच फ्रीज मध्ये ठेवू नका. ते अशा जागी ठेवा जेथे अजिबात आर्द्रता नसेल आणि हलका सूर्यप्रकाश येत असेल. फ्रीज मध्ये लसूण ठेवल्याने लसणाची चव खराब होते आणि त्याचा कुबट वास इतर पदार्थांना सुद्धा येऊ लागतो. म्हणजे जर समजा तुम्ही फ्रीज मध्ये लसूण आणि दूध एकत्र ठेवले असेल तर दूध पिताना तुम्हाला लसणाचा वास येऊ लागेल.

(वाचा :- Coronavirus In monsoon : पावसाळ्यात कोरोनापासून कसा कराल स्वत:चा बचाव? जाणून घ्या महत्वपूर्ण टिप्स!)

केळी

केळी सुद्धा अजिबात फ्रीज मध्ये ठेवू नये. कारण केळींच्या वरची साल अतिशय मऊ आणि आर्द्रतेने भरलेली असते. ही सालच केळींना लवकर खराब होऊ देत नाही आणि त्याला सुरक्षा प्रदान करते. जर तुम्ही केळी फ्रीज मध्ये ठेवाल तर याची साल गळून पडेल. साल गळून पडल्याने केळींचे आयुषमान घटते. याशिवाय त्याची चव देखील बदलते. म्हणजे ताजी केळी खाताना तुम्हाला जी चव मिळते ती चव फ्रीज मध्ये ठेवलेली केळी खाताना येत नाही. तर मंडळी आता तुमच्या लक्षात आले असेलच की हे पदार्थ फ्रीज मध्ये ठेवल्याने काय नुकसान होते. त्यामुळे उन्हाळ्यात किंवा बाहेर जास्त उष्णता असतानाही अजिबात हे पदार्थ फ्रीज मध्ये ठेवू नका. त्यांची खरी जागा ही बाहेर खेळत्या हवेतच आहे. हा लेख आपल्या इतर मित्रमंडळींसोबत सुद्धा शेअर करा आणि त्यांना देखील ही अमुल्य माहिती द्या.

(वाचा :- या रामबाण घरगुती उपचारांनी होईल अ‍ॅपेंडिक्सच्या वेदनेतून सुटका!)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज