अ‍ॅपशहर

फोबियावर बोलू काही!

प्रत्येकाला काही ना काही गोष्टीची भीती असते. उंचावर गेल्यावर तिथून खाली पडू अशी किंवा गर्द अंधारात आपल्याला कोणीतरी इजा पोहोचवेल अशी काही लोकांना भीती सतावत असते. तर काहींना एखाद्या ठराविक प्राण्याची भीती असते तर काहींना काही ठराविक रंगाची भीती असते. या भीतीलाच वैद्यकीय भाषेत फोबिया असं म्हणतात. कोणत्याही परिस्थितीत किंवा कोणत्याही गोष्टीविषयी भीती निर्माण होऊ शकते. तर अशाच काही फोबियांविषयीची माहिती, त्यांची लक्षणं आणि उपाय हे आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत.

Maharashtra Times 19 Jul 2017, 1:18 pm
डॉ. सागर मुंदडा, एमबीबीएस, एमडी,
महाराष्ट्र टाइम्स.कॉम phobia and its types
फोबियावर बोलू काही!

मेंदू-मनोविकार व व्यसनमुक्तीतज्ज्ञ
प्रत्येकाला काही ना काही गोष्टीची भीती असते. उंचावर गेल्यावर तिथून खाली पडू अशी किंवा गर्द अंधारात आपल्याला कोणीतरी इजा पोहोचवेल अशी काही लोकांना भीती सतावत असते. तर काहींना एखाद्या ठराविक प्राण्याची भीती असते तर काहींना काही ठराविक रंगाची भीती असते. या भीतीलाच वैद्यकीय भाषेत फोबिया असं म्हणतात. कोणत्याही परिस्थितीत किंवा कोणत्याही गोष्टीविषयी भीती निर्माण होऊ शकते. तर अशाच काही फोबियांविषयीची माहिती, त्यांची लक्षणं आणि उपाय हे आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत.
सोशल फोबिया
या प्रकारचा फोबिया असलेली लोकं जास्ती लोकांमध्ये मिसळत नाहीत. आपण लोकांमध्ये मिसळलो तर इतर लोकं आपल्यालाविषयी काही तरी बोलतील अशा चिंतेने ते ग्रासलेले असतात. तसंच इतर लोकं आपला अपमान करतील या विचाराने ते संकोचित स्वभावाचे असतात. अशी मंडळी फार एकलकोंडी स्वभावाची असतात.
अगोरा फोबिया
सार्वजनिक ठिकाणी किंवा घराबाहेर जाण्याची भीती या रुग्णांना सतावत असते.
याशिवाय अनेकविध गोष्टींची, वस्तूंची भीती असते. जसं की, उंची, कोळी, उंदीर, बंद जागा, सुई, अंधार, काही अन्नपदार्थ, रक्त किंवा जखमा अशा काही गोष्टींचीही अनेकांना भीती वाटते. ज्या गोष्टींची, परिस्थितीची किंवा गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट करण्यास किंवा परिस्थिती टाळण्याचा सर्वतोपरी प्रयत्न फोबिया असलेली मंडळी टाळतात. उदाहरणार्थ, अगोरा फोबिया असलेली लोकं घरातून बाहेर पडण्याचं टाळतात.
लक्षणं
अचानक हृदयाची धडधड वाढणं हे प्राथमिक लक्षण असतं. या भीतीने आपण मरणार या भीतीने अनेकदा रुग्णांना ग्रासलेलं असतं.
उपाय
ज्या वस्तूंमुळे किंवा परिस्थितीमुळे तुम्हाला भीती वाटते किंवा ज्यामुळे चिंतातूर होतात अशाची यादी बनवा. भीती घालवण्यासाठी टप्प्या-टप्प्याने सामोरं जा. उदाहरणार्थ, एखाद्याला कोळीची भीती वाटत असेल तर त्याला पहिले कोळ्याचे फोटो दाखवा मग जिवंत कोळ्याला हात लावण्याचा प्रयत्न करु शकतात. तसंच ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते ती थेट करुन बघण्याचा प्रयत्न करा, पण असं करताना तुमच्या अगदी जवळच्या मित्र-मैत्रिणींची किंवा थेरपिस्टची मदत घ्या. उदाहरणार्थ, एखाद्याला विमानाने प्रवास करण्याची भीती वाटत असेल तर थोडं धाडस करुन मित्र-मैत्रिणींबरोबर विमानाचा प्रवास करा. आवश्यक वाटल्यास मनोचिकित्सकांची मदत जरुर घ्या. मनात कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नका. आनंदी राहा.

Close

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज