यामध्ये तिने शरीरातील हार्मोन्स उत्पादन नियंत्रित करण्यासाठी काही बियांचे नियमितपणे सेवन करण्याचे फायदे सांगितले आहेत, ज्याला बीज सायकलिंग असं म्हणतात. या बिया किराणा मालाच्या दुकानात अगदी सहज सापडतात, ज्या कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर सुद्धा फायदेशीर आहेत.
नेमकं काय आहे सीड सायकलिंग?
नावाप्रमाणेच त्यात विविध प्रकारच्या बिया समाविष्ट केल्या गेल्या आहेत. बीज सायकलिंग बाबत पूजा मखीजा सांगते की हा एक नैसर्गिक उपचार आहे, ज्याचा वापर हार्मोन्सचे संतुलन (hormonal balance), प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी (fertility) आणि रजोनिवृत्तीची (menopause) लक्षणे कमी करण्यासाठी केला जातो. यामध्ये हार्मोन्स संतुलित करण्यासाठी महिन्याच्या वेगवेगळ्या वेळी विशिष्ट बिया खाव्या लागतात, ज्या कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात सहजपणे मिळतात. आपल्या मासिक पाळीच्या पहिल्या सहामाहीत हार्मोन एस्ट्रोजेन आणि दुसऱ्या सहामाहीत हार्मोन प्रोजेस्टेरॉन यांच्यातील निरोगी संतुलन वाढवण्यासाठी खूप मदत करते.
सीड सायकलिंग मासिक पाळी ठीक करण्यासाठी कसं मदत करतं?
न्युट्रिशनिस्ट दोन वेगवेगळ्या टप्प्यांवर अळशीच्या बिया, भोपळ्याच्या बिया, सूर्यफूलाच्या बिया आणि तीळाच्या बिया या चार प्रकारच्या बिया खाण्याचा सल्ला देतात. त्यांच्या मते, या चारही प्रकारच्या बिया मॅंगनीज, मॅग्नेशियम, तांबे, थायमिन, व्हिटॅमिन ई, फायबर आणि हेल्दी फॅटने समृद्ध आहेत. हे पोषक आपल्या शरीरात विविध भूमिका बजावतात आणि एक अकार्यक्षम किंवा गडबडलेल्या प्रणालीला दुरुस्त करण्यास मदत करतात. अळशीच्या म्हणजेच फ्लेक्स बिया आणि भोपळ्याच्या बिया इस्ट्रोजेनच्या उत्पादनात मदत करतात. सूर्यफूल आणि तिळाच्या बिया शरीरातील प्रोजेस्टेरॉनचा स्तर कांबों एंटरोडिओलद्वारे संतुलित करते. त्यांचे सेवन करणे वंध्यत्व (infertility), जास्त रक्तस्त्राव (heavy bleeding) आणि अनियमित मासिक पाळीसाठी एक पर्यायी उपाय आहे. आम्ही तुम्हाला सांगू की सिड्स सायकलिंग दोन टप्प्यात काम करते. फॉलिकल फेस आणि ल्यूटियल फेज. या दोन्ही टप्प्यांबद्दल किंवा फेजबाबत सविस्तर माहिती पुढच्या मुद्द्यांमध्ये आपण जाणून घेऊया.
मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून 15व्या दिवसापर्यंत करा या बियांचे सेवन
आपल्या मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून ते 15 व्या दिवसापर्यंत फॉलिकल टप्पा सुरू असतो. या दिवसांमध्ये न्युट्रिशनिस्ट नियमितपणे दोन चमचे अळशीच्या बिया आणि भोपळ्यांच्या बिया खाण्याचा सल्ला देतात. त्यांच्या मते, या बियांमध्ये उपस्थित लिग्निन इस्ट्रोजेन हार्मोन्सची पातळी वाढवण्यासाठी मदत करते आणि ही काळाची गरज आहे.
15 व्या दिवसापासून 28 व्या दिवसापर्यंत तीळ व सुर्यफुलाच्या बियांचे करा सेवन
तुमच्या मासिक पाळीत सुरू असलेल्या सायकलच्या 15 व्या दिवसापासून 28 व्या दिवसाच्या ल्युटियल टप्प्यात दोन चमचे तीळ आणि सूर्यफूलांच्या बियांचे नियमितपणे सेवन केले पाहिजे. वास्तविक, या टप्प्यात पुढील दोन आठवड्यांसाठी स्त्रियांना अधिक प्रोजेस्टेरॉनची आवश्यकता असते, जे या दोन्ही बियांमध्ये सहजपणे आढळते.
बियांचे अन्य फायदे
- भोपळ्याच्या आणि सूर्यफूलाच्या बिया स्तनाच्या कर्करोगापासून संरक्षण करतात
- अळशीच्या बिया ब्लड शुगर कंट्रोलशी संबंधित आहे तर भोपळ्याच्या बिया तेल प्रोस्टेट आणि मूत्र संबंधित विकार बरे करण्यास मदत करतात
- तिळाच्या बिया दाह किंवा वेदना कमी होण्याशी संबंधित आहे
- सूर्यफूलांच्या बिया खाल्ल्याने हृदयरोगाशी संबंधित जोखीम घटकांत सुधारणा होऊ शकते
अनेक संशोधनांनुसार, 50 टक्के महिलांचे हार्मोनल असंतुलन त्यांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम करते. मासिक पाळी, रजोनिवृत्ती आणि गर्भधारणेच्या सुरूवातीस हार्मोनल असंतुलनामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. या प्रकरणात हे बियाणे खाणे हा आपल्या आहाराची गुणवत्ता आणि एकूण आरोग्य सुधारण्याचा एक चांगला मार्ग आहे.