अ‍ॅपशहर

गोडा-धोडावर ठेवा नियंत्रण

तुम्ही गोड पदार्थ जास्त खातायं का? अधिक प्रमाणात गोड पदार्थ खाल्यामुळे तुमच्या स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आता तुम्ही आहारातील गोडाचं प्रमाण कमी करायला हवं.

Maharashtra Times 27 May 2016, 12:56 am
तुम्ही गोड पदार्थ जास्त खातायं का? अधिक प्रमाणात गोड पदार्थ खाल्यामुळे तुमच्या स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आता तुम्ही आहारातील गोडाचं प्रमाण कमी करायला हवं. अनेकदा जाणूनबुजून गोड पदार्थ न खाण्याचे ठरवल्यावर त्या व्यक्तीला गोड पदार्थ खाण्याची अधिकच इच्छा होत असते. म्हणून गोड पदार्थ खाणं पूर्णपणे बंद करण्यापेक्षा त्याचं प्रमाण दिवसागणिक कमी करावं. त्याचंच एक उदाहरण म्हणजे, ४२ वर्षाच्या महेशला लाडू खायची खूप सवय होती. ती बंद व्हावी या हेतूने त्याने वीस दिवस लाडू खाल्ले नाहीत. पण एकविसाव्या दिवशी महेशची गोड पदार्थ खाण्याची इच्छा खूप वाढली आणि केक, चॉकलेट, जाम-बिस्किटं असे सगळे पदार्थ त्याने एकाचवेळी फस्त केले. असं होऊ नये म्हणून गोड पदार्थ खाणं एकदमच बंद करू नका. जेवणानंतर अनेकांना काहीतरी गोड खाण्याची सवय असते. अशाने देखील त्यांचं गोडाचं प्रमाण हळूहळू कमी करावं. तसंच काही व्यक्तींना मुख्य जेवणाचं प्रमाण कमी करून त्याऐवजी गोड पदार्थ खाण्याची सवय असते. ही सवय वाईट असून अशा व्यक्तींनी योग्य आणि सकस आहार घेणं आवश्यक आहे. गोडप्रेमी मंडळींनी रोजच्या आहारात काहीसा बदल म्हणून आठवड्यातून एक दिवस स्वतःला गोड खाण्यासाठी दिला, तरी काही हरकत नाही. शिवाय वाढदिवस, लग्न आणि काही कार्यक्रम असतील तर थोडं गोड बिनधास्त खा. पण ऐरवी मात्र गोडावर नियंत्रण ठेवा.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sweets health
गोडा-धोडावर ठेवा नियंत्रण


कोणत्या गोड पदार्थात किती कॅलरीज असतात•१ कप कॅरेमल कस्टर्ड- ३६० कॅलरीज•१ कप आइस्क्रीम- ४१० कॅलरीज•१ कप गाजर- ३७० कॅलरीज•१ कप खीर- १६५ कॅलरीज•१ जिलेबी- १०० कॅलरीज•२ रसगुल्ले- १०० कॅलरीज

गोड खाण्याची सवय कशी कमी कराल?

l गोड खाण्यापूर्वी मला हे खरंच हवं आहे का, असा प्रश्न स्वतःला विचारा.

l साखर खाण्याची इच्छा होत असेल तर दात घासा.

l नैसर्गिक साखर मिळण्यासाठी संत्री आणि मोसंबी खा. त्यातून फायबरसुद्धा मिळतं.

l डाळी आणि धान्य व्यवस्थित घ्या. त्याने साखरेची फारशी गरज निर्माण होणार नाही.

l गोडाच्या ऐवजी ज्येष्ठमध, बडीशेप, साखर नसलेलं च्युइंग गम किंवा हर्बल टी याचा वापर करून बघा.

l गोड खाणं अगदीच गरजेचं असेल तर बेदाणे, खजूर, तीळाचे लाडू, जर्दाळू आणि चुरमु‍ऱ्याचे लाडू खाऊन बघा.

l गोड पदार्थ खाताना ते सावकाशपणे खा. याने चव जास्त वेळ रेंगाळत राहाते.

शब्दांकन- कल्पेशराज कुबल, कॉलेज क्लब रिपोर्टर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज