इतकंच नाही तर तुम्हाला या मुद्रेमुळे इतर बरेच फायदे मिळतील. जर तुम्ही देखील केस गळणे, पोटाशी निगडीत असंख्य समस्या (yoga stomach problem) आणि बद्धकोष्ठतेच्या (constipation) समस्येने ग्रस्त असाल, तर तुम्ही आज या लेखात सांगितलेल्या योग मुद्रा किंवा आसने ट्राय करुन पाहू शकता. चला तर जाणून घेऊया केसगळती, केसांच्या वाढीसाठी आणि बद्धकोष्ठतेसाठी कोणती योग मुद्रा उत्तम आहे.
पृथ्वी मुद्रा
जर तुम्हाला केसांशी संबंधित समस्या असतील आणि तुम्हाला तुमच्या केसांना योग्य मजबूती द्यायची असेल आणि लांबसडक व घनदाट केस हवे असतील तर तुम्ही पृथ्वी मुद्रा ट्राय करुन पाहू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की या योग मुद्रेमुळे केवळ केसांनाच फायदा होणार नाही. तर त्याउलट ही मुद्रा तुमच्या शरीरात साठवलेली उष्णता थंड करेल, रक्त प्रवाह सुधारेल, ऊर्जा वाढवेल, सहनशक्ती दुप्पट वाढवेल आणि अंतर्गत अवयव सुद्धा सुधारेल.
पृथ्वी मुद्रा करण्याची पद्धत
- सर्वप्रथम, आपल्या हाताचे तिसरे बोट किंवा रिंग फिंगर अंगठ्यावर ठेवा. ते अशा प्रकारे ठेवा की त्यांच्यामध्ये वर्तुळाकार शुन्य तयार होईल
- ही मुद्रा तुम्ही मेडिटेशन किंवा ध्यान करायला बसाल तेव्हा करा.
- या आसनात जवळ जवळ 20 ते 30 मिनिटे राहा
- याद्वारे तुमच्या केसांशी संबंधित समस्या संपतील आणि तुम्हाला इतरही अनेक आरोग्यदायी फायदे होतील.
पृथ्वी मुद्रा करण्याची योग्य पद्धत व लाभ!
पोटासाठी अपान मुद्रा
ही मुद्रा एक अतिशय प्रभावी मुद्रा आहे जी आपल्या शरीराला डिटॉक्सिफाई करण्यास मदत करते आणि खराब पचनाच्या समस्येपासून मुक्त मिळवून देते. याव्यतिरिक्त ही मुद्रा मूत्र मार्गातील विकार म्हणजेच यूरिनरी ट्रैक्ट डिसऑर्डर आणि तणावापासून देखील आराम देते. एवढेच नाही तर जर तुम्ही ही मुद्रा नियमितपणे केली तर त्याचा तुमच्या श्वसन प्रणालीलाही म्हणजेच रेस्पिरेटरी सिस्टमला फायदा होतो आणि बद्धकोष्ठते सारख्या समस्यांपासूनही आराम मिळतो. तसंच या मुद्रेमुळे मल आणि लघवी जाण्याची प्रक्रिया खूप सोपी होते.
अपान मुद्रा करण्याची पद्धत
- ही मुद्रा करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही ध्यान मुद्रा, शवासन किंवा सुप्तबद्धासन कोनासन या स्थितीत यावे
- यानंतर आपल्या दोन्ही हातांचे तिसरे बोट आणि रिंग फिंगर अंगठ्यावर ठेवावे आणि डोळे बंद करावेत आणि आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करावे.
- हे आसन फक्त आपल्याला 15 ते 20 मिनिटांसाठी करायचे आहे
- टीप - हे लक्षात ठेवा की तुम्ही ही आसने फक्त रिकाम्या पोटी केली पाहिजेत. जर तुम्ही जेवला असाल तर जेवणाच्या 2 तासां नंतरच आसन किंवा मुद्रा कराव्यात.