अ‍ॅपशहर

विमानासन

विमानासन करण्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी नष्ट होते. या आसनाचे कुठले फायदे आहेत, याविषयी...

Maharashtra Times 10 May 2017, 3:00 am
जमिनीवरील आसनावर पावलं एकमेकांना चिकटलेली, पाठीचा कणा ताठ, हाताचे पंजे मांडीजवळ चिकटलेले (ताडासन), असं उभं राहावं. श्वास घेत उजवा पाय साधारण दोन ते अडीच फूट पुढे घ्यावा. जमिनीला ९० अंशाचा कोन होईल, असा गुडघ्यातून वाकवावा. डावा पाय पाठीमागे सरळ असावा. तो गुडघ्यात वाकवू नये. तोल जात आहे असे वाटल्यास डाव्या पायाची टाच किंचित वर उचलावी. श्वास घेत दोन्ही हात सरळ डोक्याच्या वर, दंड कानाला चिकटतील असे उचलावेत. श्वास सोडत हात खाली आणत खांद्याच्या सरळ रेषेत दोन्ही बाजूला पंखासारखे पसरावे. पंजाची दिशा खालील बाजूला असावी. संथ श्वसन करत ही आसन स्थिती साधारण एक ते दोन मिनिटांपर्यंत स्थिर करावी. पूर्वस्थितीत येऊन पुन्हा दुसऱ्या पायानं हे आसन करावं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम weight loss with yog new option for best figure
विमानासन


शारीरिक लाभ ः पाय, खांदे, पोट आणि पाठीचे स्नायू मजबूत होतात. छाती ताणली जाते. शरीर सुडौल होतं. शरीरात उत्साह संचारतो आणि ऊर्जा वाढते. नितंबाच्या सांध्यांना व्यायाम होतो. ते मजबूत होतात.

वैद्यकीय लाभ ः शरीरातील अतिरिक्त चरबी नष्ट होते. श्वसन व पचनाचे विकार कमी होतात. पचन आणि श्वसनसंस्थांचं कार्य सुधारतं. जोश आणि जोम वाढतो.

मानसिक लाभ ः मन स्थिर आणि एकाग्र होतं. मानसिक आजार कमी होतात. स्मरणशक्ती वाढते. मानसिक ताण व थकवा जातो.

कोणी करू नये ः तीव्र गुडघेदुखी व खांदेदुखी असणाऱ्यांनी करू नये किंवा योगतज्ज्ञांच्या साहाय्यानं करावं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज