अ‍ॅपशहर

प्रेमभंगाचा मामला

हल्ली प्रेम जुळण्यापेक्षा प्रेमभंग होण्याचं प्रमाण जास्त दिसतंय. एका संशोधनानुसार, प्रेमभंगाचा त्रास मेंदूच्या काही भागांना होतो. एखाद्या ड्रगमुळे जेवढा त्रास होईल, तेवढाच हा त्रास असतो. म्हणूनच प्रेमभंगामुळे होणाऱ्या मानसिक ताणाला कसं सामोरं जावं याविषयी…

Maharashtra Times 13 Jul 2016, 3:15 am
-डॉ. सागर मुंदडा, मानसोपचारतज्ज्ञ, जे. जे. हॉस्पिटल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम your breakup affect your health
प्रेमभंगाचा मामला


हल्ली प्रेम जुळण्यापेक्षा प्रेमभंग होण्याचं प्रमाण जास्त दिसतंय. एका संशोधनानुसार, प्रेमभंगाचा त्रास मेंदूच्या काही भागांना होतो. एखाद्या ड्रगमुळे जेवढा त्रास होईल, तेवढाच हा त्रास असतो. म्हणूनच प्रेमभंगामुळे होणाऱ्या मानसिक ताणाला कसं सामोरं जावं याविषयी…



साधारणपणे ७४ टक्के महिला आणि ६४ टक्के पुरुष त्यांच्या माजी जोडीदाराचा जास्त विचार करतात. ७६ टक्के महिला आणि ७० टक्के पुरुष त्यांच्या माजी जोडीदाराचा इंटरनेटवर पाठलाग करतात. ५० टक्के महिला आणि ४० टक्के पुरुष सतत फेसबुक किंवा इतर ऑनलाइन प्रोफाइल बघत असतात.
प्रेमभंग झाल्यानंतर व्यक्ती पाच टप्प्यातून जातात.

प्रेमभंग झाल्यानंतर कित्येकदा असं वाटतं की, त्याला किंवा तिला वेळ द्यावा. कदाचित ती व्यक्ती आपणहून मेसेज किंवा फोन करेल. आपल्याकडे परत येईल. न राहवून काही दिवसांनी तुम्हीच स्वत:हून त्याला किंवा तिला मेसेज करता. पण अशा परिस्थितीत नकारार्थी उत्तर मिळण्याचे प्रमाण जास्त असते.

समोरुन नकार मि‍ळाला की, आपल्याला हळूहळू राग येऊ लागतो. मग सगळं जगच आपल्या विरोधात गेलं आहे, असं वाटतं. या सगळ्यासाठी आपण त्या व्यक्तीला जबाबदार धरतो.

तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला प्रेमभंगाचा मानसिक त्रास जाणवू लागतो. तुमच्या नात्यामधील अगदी लहानशी गोष्ट किंवा घटना तुम्हाला आठवायला लागतात. हा टप्पा जास्त त्रासदायक असतो.

ठराविक काळानंतर तुम्हाला या सगळ्याचा विसर पडतो आणि तुमच्यामध्ये सकारात्मक बदल होतात. हळूहळू तुम्ही प्रेमभंगातून सावरता. अशाप्रकारे सकारात्मक भावना आणि विचार यामुळे तुम्ही प्रेमभंगाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडता.

पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यात तुम्हीच स्वत:ला सगळ्या प्रकरणातून सावरतात. या महत्त्वाच्या टप्प्यात तुम्ही स्वत:चे मित्र, सोबती किंवा गुरु बनता. अशावेळी तुम्हाला एकांतात राहायला आवडतं.

प्रेमभंगापासून स्वत:ला सावरण्यासाठी काही टिप्स
-तुम्ही एकटे आहात हा विचार सर्वात प्रथम मनातून काढून टाका.
-चांगलं संगीत किंवा व्हिडीओ पहा.
-तुमचे कॉमन मित्र-मैत्रिणी असल्यास काही काळ त्यांच्यापासून दूर रहा.
-प्रेमभंग झाल्यानंतर लगेच दुसरं नातं जमवण्याची घाई करु नका. कारण अशा परिस्थितीत तुम्ही भावनिक दृष्ट्या तयार नसता.
-तुमच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या भावंडाशी हे सगळं शेअर करा. त्यामुळे तुम्हाला हलकं वाटेल.

-शब्दांकन- शब्दुली कुलकर्णी, कॉलेज क्लब रिपोर्टर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज