अ‍ॅपशहर

चेहऱ्यातून झळकतं तुमचं आरोग्य

खरं म्हंटलं तर चेहरा हा माणसाचा आरसा असून बऱ्याचदा त्याच्याशी निगडीत समस्या आपण ग्राह्य धरतो. समोरच्याचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य तपासण्यासाठी चेहरा मदत करतो. त्यातल्या त्यात उन्हाळ्यात सतत येणाऱ्या घामामुळे त्वचेवर तेल साचतं आणि इन्फेक्शन होतं. तसंच बाहेरचं खाणं, व्यसनं, वातावरण या सर्व गोष्टीमुळे आपली त्वचा अजून खराब होते.

Maharashtra Times 23 May 2017, 5:43 pm
खरं म्हंटलं तर चेहरा हा माणसाचा आरसा असून बऱ्याचदा त्याच्याशी निगडीत समस्या आपण ग्राह्य धरतो. समोरच्याचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य तपासण्यासाठी चेहरा मदत करतो. त्यातल्या त्यात उन्हाळ्यात सतत येणाऱ्या घामामुळे त्वचेवर तेल साचतं आणि इन्फेक्शन होतं. तसंच बाहेरचं खाणं, व्यसनं, वातावरण या सर्व गोष्टीमुळे आपली त्वचा अजून खराब होते. त्यामुळे या दिवसात पिंपल्स, ब्लॅकहेड्स, व्हाइटहेट्सचा त्रास अधिक होतो आणि त्यावर तत्काळ उपाय करणं आवश्यक असतं. त्यासाठी काही टिप्स-
महाराष्ट्र टाइम्स.कॉम your face predicts your health
चेहऱ्यातून झळकतं तुमचं आरोग्य

नैसर्गिकरित्या वाढवा कोलाजेनचं प्रमाण
शरीरातील कोलाजेनच्या कमतरतेमुळेदेखील तुमची त्वचा रुक्ष होऊन सुरकुत्या येऊ शकतात. शरीरात कोलाजेनचं प्रमाण कमी असल्यास व्हिटॅमिन 'सी' मिळवण्या करता तुम्ही आहारात संत्री, द्राक्षे, पपई, केळे याचा जास्त वापर करा. तसंच व्हिटॅमिन इ आणि व्हिटॅमिन ए असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा.
चेहऱ्यावरील तेलकट करा कमी
गरम पाण्यात रेश्माचं कापड भिजवून ते फिरवावं. रेश्माच्या कापडामुळे चेहऱ्यावर जमा झालेलं तेल शोषलं जातं. यामुळे त्वचा आणखी उजळ आणि तेजस्वी दिसण्यास सुरुवात होते.

संकलन: दीपाली बुद्धिवंत, कॉलेज क्लब रिपोर्टर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज