अ‍ॅपशहर

रंगून जा ‘ऱ्हिदम’मध्ये

भविष्यात आपला देश कसा असेल, तंत्रज्ञान आणि संस्कृती या गोष्टी कशा बदलत जातील या गोष्टींविषयी तुम्हाला उत्सुकता आहे? मग तुम्ही अथर्व कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या 'ऱ्हिदम' या कल्चरल फेस्टिव्हलला हजेरी लावायला हवी.

Maharashtra Times 4 Mar 2017, 3:45 am
मयूर परदेशी, कॉलेज क्लब रिपोर्टर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम atharv college of engineering
रंगून जा ‘ऱ्हिदम’मध्ये


भविष्यात आपला देश कसा असेल, तंत्रज्ञान आणि संस्कृती या गोष्टी कशा बदलत जातील या गोष्टींविषयी तुम्हाला उत्सुकता आहे? मग तुम्ही अथर्व कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या 'ऱ्हिदम' या कल्चरल फेस्टिव्हलला हजेरी लावायला हवी.

भविष्यात आपला देश कसा असेल, तंत्रज्ञान आणि संस्कृती या गोष्टी कशा बदलत जातील या गोष्टींविषयी तुम्हाला उत्सुकता आहे? मग तुम्ही अथर्व कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या 'ऱ्हिदम' या कल्चरल फेस्टिव्हलला हजेरी लावायला हवी. 'रूपांतर: इन्ट्रोड्युसिंग द इंडिया २.०' अशी थीम असलेल्या या फेस्टमध्ये भविष्यकाळात आपला देश कसा प्रगती करेल, पाश्चिमात्त्य संस्कृती आत्मसात करतानाही भारतीय संस्कृतीसुद्धा कशाप्रकारे जपली जात आहे या सगळ्यांचं चित्रीकरण पाहत त्याचा अनुभव घेता येईल. येत्या ५ ते ११ मार्च दरम्यान हा फेस्टिव्हल रंगणार असून, ‘महाराष्ट्र टाइम्स’ याचा मीडिया पार्टनर आहे.

लिटररी आर्टस, फाईन आर्टसमधल्या विविध प्रकारांसह तंत्रज्ञान आणि अशा अनेक मनोरंजक इव्हेंट्सचा सामावेश रिदममध्ये आहे. या फेस्टिव्हलचं आकर्षण असेल मॅरेथॉन, फिल्म फेस्टिव्हल, फॅशन शो, डान्स व नाटक या इंटरकॉलेज स्पर्धा. गाण्याच्या तालांवर थिरकण्याची आवड लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना म्युझिकल नाइटचा मनसोक्त आनंद इथे लुटता येईल. यासाठी वॉर ऑफ बँड्स, डीजे नाईट्स आणि प्रॉमचं देखील आयोजन केले आहे.

यासारख्या इव्हेंट्ससोबतच यावर्षी रिदममध्ये स्ट्राँगमॅन असा वेगळा इव्हेंट आहे, ज्यात डेडलिफ्ट, पुश अप्स यासारखे विविध वर्कआऊट करून विद्यार्थी बक्षिस जिंकू शकतात. यासोबतच सेल्फी स्पर्धा, बेस्ट ग्रुप डॅब, बेस्ट बीअर्ड, ट्रेजर हंट, रांगोळी व पेंटबॉल यासोबतच हॉगॅथॉन अशा अनेक मनोरंजक स्पर्धा होतील. विद्यार्थी आपली कौशल्यं शीलआऊट पेंटिंग, बेस्ट आऊट ऑफ वेस्ट, पॉट पेंटिंग, आईस क्रीम स्टीक्स, बॅलॉट ऑफ वर्ड्स व स्ट्रीट प्ले अशा स्पर्धांमधूनही दाखवू शकतील. विविध प्रकारचे टेक्निकल इव्हेंट जसे लॅन गेम्स आणि निऑन गेम्स देखील या फेस्टिवलमध्ये होणार आहे. संपर्क - वेदांत भाटकर : ९६१९४९२६७१ .

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज