अ‍ॅपशहर

धून 'बँड स्लॅम'ची

'युवा हॅशटॅग' हा अनोखा फेस्टिव्हल विद्यार्थ्यांच्या प्रचंड उत्साहात चांगलाच रंगला. देशभरातील ३९ शिक्षण संस्थांनी एकत्र येऊन या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं. फेस्टची सुरूवात 'योगा डे'ने झाली ज्याला ६००० विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला. 'श्री विलेपार्ले केळवणी मंडळ' ही शैक्षणिक संस्था या फेस्टिव्हलची मुख्य आयोजक असून 'महाराष्ट्र टाइम्स' मीडिया पार्टनर होता.

Maharashtra Times 24 Jan 2017, 12:45 am
>> अस्मिता जाधव, अस्मिता कदम, कॉलेज क्लब रिपोर्टर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम band slam
धून 'बँड स्लॅम'ची

'युवा हॅशटॅग' हा अनोखा फेस्टिव्हल विद्यार्थ्यांच्या प्रचंड उत्साहात चांगलाच रंगला. देशभरातील ३९ शिक्षण संस्थांनी एकत्र येऊन या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं. फेस्टची सुरूवात 'योगा डे'ने झाली ज्याला ६००० विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला. 'श्री विलेपार्ले केळवणी मंडळ' ही शैक्षणिक संस्था या फेस्टिव्हलची मुख्य आयोजक असून 'महाराष्ट्र टाइम्स' मीडिया पार्टनर होता.

सिनेमा जगताशी संबंधित स्पर्धा खूप अनोख्या पद्धतीने स्पर्धकांसमोर मांडण्यात आल्या आणि त्याला मिळालेला प्रतिसाद उल्लेखनीय होता. गेम्स प्रेमींसाठी खास मेजवानी होती ती म्हणजे 'काउंटर स्ट्राईक', 'फिफा'१७', 'कॉल ओफ ड्युटी' आणि 'डोटा' यासारख्या गेम्सची. सर्जनशीलता आणि विद्यार्थ्यांमधील कलाकाराला वाव देणारे क्रीएटीव्ह आणि फाइन आर्टस्च्या स्पर्धा आव्हानात्मक असूनही स्पर्धकांच्या उत्साहामुळे मजेशीर ठरल्या. शास्त्रीय नृत्याच्या 'नवरस' या स्पर्धेत काही अशी नृत्य सादर झाली की परीक्षकही थक्कच झाले. 'बँड स्लॅम'मध्ये सादर झालेली गाण्यांनी जमलेल्यांना थिरकायला लावलं. शेवटच्या दिवशी पथनाट्याद्वारे विविध सामाजिक विषय हाताळले गेले.

'मिस्टर आणि मिस युवा हॅशटॅग' या महत्त्वपूर्ण किताबासाठी अटी-तटीचा सामना पाहायला मिळाला. फेस्टिव्हलचे ते चार दिवस भन्नाट होते आणि अविस्मरणिय अनुभव देऊन गेले. या फेस्टचे प्रथम स्थान उषा प्रवीण गांधी कॉलेजने पटकवलं तर दुसरं स्थानाचा मान पोदार कॉलेजला मिळाला. क्रीडा प्रकारतल्या स्पर्धांत मिठीबाई कॉलेजने बाजी मारली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज