अ‍ॅपशहर

आम्ही रमलो इतिहासात!

भारताच्या या इतिहासात रमलेले विद्यार्थी व शिक्षक 'इतिहास सप्ताह'च्या निमित्ताने भवन्स कॉलेजमधे पहायला मिळाले. या सप्ताहात विविध स्पर्धा व कार्यक्रमांद्वारे वर्तमानकाळातून डोकावून उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आलं.

Maharashtra Times 7 Sep 2017, 2:34 am
हर्षदा नारकर, भवन्स कॉलेज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bhavans college
आम्ही रमलो इतिहासात!


भारताच्या या इतिहासात रमलेले विद्यार्थी व शिक्षक 'इतिहास सप्ताह'च्या निमित्ताने भवन्स कॉलेजमधे पहायला मिळाले. या सप्ताहात विविध स्पर्धा व कार्यक्रमांद्वारे वर्तमानकाळातून डोकावून उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आलं.

इतिहासात डोकावताना आपल्याला कळतं की इतिहास समजून घेणं किती महत्त्वाचा आहे. इतिहासातून एखाद्या देशाची आणि तेथील संस्कृती समजते. आपल्या भारतालाही प्राचीन इतिहास लाभला आहे. भारताच्या या इतिहासात रमलेले विद्यार्थी व शिक्षक 'इतिहास सप्ताह'च्या निमित्ताने भवन्स कॉलेजमधे पहायला मिळाले. या सप्ताहात विविध स्पर्धा व कार्यक्रमांद्वारे वर्तमानकाळातून डोकावून उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आलं.

वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा या स्पर्धांमधून वर्तमानातील विविध प्रश्नांची उकल विद्यार्थ्यांद्वारे केली गेली. पोस्टर मेकिंग स्पर्धेमध्ये भारतीय कला व स्थापत्याचा आविष्कार करण्यात आला. या सप्ताहात विद्यार्थ्यांना भवन्स कॉलेजची माजी विद्यार्थिनी श्रध्दा बाली हीचं मार्गदर्शन मिळालं. ती सध्या संशोधन क्षेत्रात कार्यरत आहे. तिचा विद्यार्थी दशेपासून आतापर्यंतचा प्रवास विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा ठरला. तसंच भवन्स कॉलेजचे ग्रंथपाल रमेश पलोटी यांनी विद्यार्थ्यांना 'लायब्ररी सायन्स'मधील करिअरच्या संधी याबाबत मार्गदर्शन केलं. इतिहास सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी विविध प्रांतातील संस्कृतीचे सर्वांगीण दर्शन विद्यार्थ्यांद्वारे घडवण्यात आले. विद्यार्थीदेखील यात अगदी रमून गेले होते.

विशेष म्हणजे संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांद्वारे स्वयंप्रेरणेने करण्यात आलं व या माध्यमातून विद्यार्थांमधील नेतृत्व गुणांना वाव देण्यात आला. मागील २५-३० वर्षांपासून विविधांगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. या पुढेही असेच कार्यक्रम राबवण्यात येतील असा निर्धार इतिहास विभाग प्रमुखांनी केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज