अ‍ॅपशहर

कोडं 'मिस्टरी हंट'चं

अभ्यासाचा कंटाळा आला आणि अभ्यास जर खेळाच्या माध्यमातून शिकवण्यात आलं तर मग विद्यार्थ्यांना कॉलेज कॅम्पसमध्ये असेच खेळ खेळून कितीही कठीण संकल्पना सहजपणे लक्षात येतील.

Maharashtra Times 20 Feb 2017, 12:25 am
अस्मिता कदम, दीपाली बुद्धिवंत,
महाराष्ट्र टाइम्स.कॉम breakthrough festival at h r college
कोडं 'मिस्टरी हंट'चं

कॉलेज क्लब रिपोर्टर
अभ्यासाचा कंटाळा आला आणि अभ्यास जर खेळाच्या माध्यमातून शिकवण्यात आलं तर मग विद्यार्थ्यांना कॉलेज कॅम्पसमध्ये असेच खेळ खेळून कितीही कठीण संकल्पना सहजपणे लक्षात येतील. अशाच खेळांच आयोजन एच. आर. कॉलेजच्या फेमा (फायनान्स एंटरप्रेनुअर मार्केटींग असोसिएशन) कल्बने 'ब्रेकथ्रू' या फेस्टिव्हलच्या निमित्ताने केलं होतं. अशा कंटाळवाण्या अभ्यासाची उत्सुकता निर्माण करणाऱ्या इव्हेंटचा 'महाराष्ट्र टाइम्स' मीडिया पार्टनर होता.
विद्यार्थ्यांना स्वतःचे नवे व्यवसाय करण्याची कल्पना परीक्षकांसमोर मांडायची संधी मिळाली ती म्हणजे 'शार्क टँक' या स्पर्धेतून. 'बजेट ब्रेकर' स्पर्धेत स्पर्धकांना थोड्या पैशात चांगला व्यवसाय करण्याविषयीच्या त्यांच्या कल्पना मांडायच्या होत्या. 'पिक्चर स्पीक थाउजंड वर्डस' या स्पर्धेत स्पर्धकांनी असे वेगवेगळे फोटो काढले, ज्याचं मूल्य हजार शब्दांइतकं होतं. 'कार्ड-ओ-डील' ही स्पर्धा उनो कार्डप्रमाणे खेळायची होती. यामध्ये स्पर्धकांची बुद्धिमत्ता आणि त्यांची खेळावरची पकड याचीच परीक्षा घेतली गेली. 'जॅम' या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी एका मिनिटांत प्रश्नाचे बरोबर असे उत्तर दिली आणि इव्हेंट रंगला. 'कॅटलेझर'या गेममध्ये स्पर्धकांना काही वस्तू विकायच्या होत्या आणि नफा मिळवायचा होता. विद्यार्थ्यांचा स्वतःवरील आत्मविश्वास या स्पर्धेतून पाहायला मिळाला. 'मिस्टरी हंट' या इव्हेंटमध्ये स्पर्धकांना शेरलॉक होम्सप्रमाणे दिलेल्या केसेस विशिष्ट वेळेत सोडवायच्या होत्या. विद्यार्थ्यांनी वेळेचं नियोजन करून बुद्धी पणाला लाऊन या केसेस सोडवल्या. 'स्टुडंट ऑफ द इयर' ही स्पर्धा मुख्य आकर्षण होती. स्पर्धकांना वेगवेगळे ट्विस्ट टाकून दिलेले टास्क पूर्ण करायचे होते. या क्लबचा प्रमुख सुक्रित माहिती देताना सांगतो की, 'स्पर्धांच्या आयोजनामुळे विद्यार्थ्यांचाही अभ्यासाकडे पाहण्याचा कल बदलतो. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आणि आयोजकांच्या मेहनतीमुळे हा इव्हेंट यशस्वी झाला. असे अजून मजा-मस्तीपर आणि हटके इव्हेंटचं आयोजन करून आम्ही या क्षेत्रात विद्यार्थ्यांची रूची निर्माण करू'.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज