अ‍ॅपशहर

डी फॉर डायमेन्शन्स

कॉलेज फेस्टिव्हल म्हटलं की आठवते ती मित्र-मैत्रिणींसोबत केलेली मज्जा-मस्ती अन् धम्माल. एखादा फेस्टिव्हल दणक्यात होण्यासाठी मुलांनी घेतलेली मेहनत, शिक्षकांनी केलेलं मार्गदर्शन अशा सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. असाच काहीसा आगळावेगळा आणि नाविन्यपूर्ण फेस्ट रंगला तो म्हणजे मुलुंडच्या वझे-केळकर कॉलेजमध्ये.

Maharashtra Times 27 Dec 2016, 12:55 am
>> मुंबई टाइम्स टीम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम diamensions at kelkar college
डी फॉर डायमेन्शन्स


कॉलेज फेस्टिव्हल म्हटलं की आठवते ती मित्र-मैत्रिणींसोबत केलेली मज्जा-मस्ती अन् धम्माल. एखादा फेस्टिव्हल दणक्यात होण्यासाठी मुलांनी घेतलेली मेहनत, शिक्षकांनी केलेलं मार्गदर्शन अशा सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. असाच काहीसा आगळावेगळा आणि नाविन्यपूर्ण फेस्ट रंगला तो म्हणजे मुलुंडच्या वझे-केळकर कॉलेजमध्ये. दोन दिवस तुफान प्रतिसादात चाललेल्या या फेस्टचं नाव 'डायमेन्शन्स' असं होतं. फेस्टिव्हलची थीम 'द थेटर ऑफ ड्रीम' अशी होती. या फेस्टिव्हलचा मीडीया पार्टनर 'महाराष्ट्र टाइम्स' होता.

मॅन व्हर्सेस फूड, पेरीस्कोप हे इव्हेंट्स सगळ्यात हटके ठरले. पेरीस्कोप या इव्हेंटमध्ये 'रोटीस टू रोल्स रॉयल' या विषयावर चर्चा झाली. त्याशिवाय गेम ऑफ थ्रोन्स, क्वीज आणि थिएटर ऑफ द ड्रीम्स हे इव्हेंट्सदेखील झाले. फेस्टिव्हलमधील विद्यार्थ्यांचा सर्वात आवडता इव्हेंट असतो तो म्हणजे डी. जे नाइट. कॉलेजच्या ग्राऊंडवर संध्याकाळी डीजे नावेद यांच्या बिट्सवर तमाम तरुणाईने ताल धरला. 'दरवर्षी केळकर कॉलेजच्या डायमेन्शन्स या फेस्टिव्हलला तरूणाईचा उदंड प्रतिसाद लाभतो. यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात सर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी फेस्टिव्हलला उपस्थिती लावली आणि फेस्टिव्हल अजूनच दणक्यात झाला. याचं संपूर्ण श्रेय विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असलेल्या शिक्षकांचं आहे', असं मत कॉलेजचे प्रिन्सिपल डॉ.बी.बी. शर्मा यांनी व्यक्त केलं.

रंगला मॅन व्हर्सेस फूड

सर्वात जास्त गंमत आली ती म्हणजे मॅन व्हर्सेस फूड या इव्हेंटमध्ये. यात स्पर्धकांना कोणत्याही दोन अगदी विरुध्द पदार्थांच मिश्रण खायला देण्यात आलं. उदाहरणार्थ, केळं आणि सॉसचं मिश्रण. अशा मिश्रणाबद्दल विचार करूनच विचित्र वाटतं. पण हीच मज्जा विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष फेस्टिव्हलमध्ये अनुभवली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज