अ‍ॅपशहर

आमची पावसाळी सुट्टी!

महिनाभर चालणाऱ्या परीक्षेनंतर अखेर या विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे सुट्टी कशी एन्जॉय करायची याचे अनेक प्लॅन्स सध्या तयार होतायत, त्याविषयी...

Maharashtra Times 20 Jun 2017, 12:12 am
असाइनमेंट्स, प्रॅक्टीकल्स, तोंडी परीक्षा आणि ऐन उन्हाळ्यात इतरांना सुट्ट्या असतात तेव्हा लेखी परीक्षा, हे ऐकून तुमच्यासमोरही एका इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांचं चित्र उभं राहिलंच असेल. महिनाभर चालणाऱ्या परीक्षेनंतर अखेर या विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे सुट्टी कशी एन्जॉय करायची याचे अनेक प्लॅन्स सध्या तयार होतायत, त्याविषयी...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम engineering students to enjoy their rainy holidays
आमची पावसाळी सुट्टी!

संपदा जोशी, कॉलेज क्लब रिपोर्टर
एक महिना सुरू असलेली परीक्षा, रोजचं अपडाऊन आणि नकोसा झालेला अभ्यास... या सगळ्यातून अखेर इंजिनीअरिंगला असणाऱ्या विद्यार्थ्यांची सुटका झाली आणि त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. इंजिनीअरिंग म्हणजे सगळ्यात कठीण क्षेत्र, असा समज सगळीकडे आहे. खूप साऱ्या असाइनमेंट, प्रॅक्टीकल्स, ६-७ तास कॉलेज आणि एक महिना चालणारी परीक्षा या सगळ्या गोष्टींनी इंजिनीअरिंग करणारे विद्यार्थी अक्षरशः वैतागून जातात. अशावेळेस त्यांना आधार असतो तो जूनमध्ये मिळणाऱ्या सुट्टीचा!
इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांची सुट्टी सुरु झालीय. कला, वाणिज्य, विज्ञान यांचे जरी कॉलेजेस् सुरू झालेले असले तरी इंजिनीअरिंगचे विद्यार्थी मात्र सुट्टीचा पुरेपुर आनंद लुटताय. कोणी ट्रेकला जाऊन पावसाची मज्जा घेतंय तर कोणी थेट आपल्या गावी जाऊन अंडरग्राऊंड झालंय. इंजिनीअरिंगच्या सुट्टीचे विविध रंग बघायला मिळताय. पण काही विद्यार्थी मात्र सुट्टीचा सदुपयोग करताना दिसतायत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपआपल्या कॉलेजकडून इंटर्नशिपसाठी परवानगी घेऊन एक महिना इंटर्नशिप करायला सुरूवात देखील केली आहे, तर काहींनी मात्र संपूर्ण सुट्टीत पावसाचा आनंद घेऊन आराम करण्याचा प्लॅन केलाय. मे महिन्यातील उन्हाळ्याची सुट्टी भलेही जूनच्या पावसात मिळाली तरीही ही सुट्टी यादगार बनवायची असा पण विद्यार्थ्यांनी केलाय.
इंजिनीअरिंग आणि या क्षेत्राचे विद्यार्थी हे नेहमीच इतरांपेक्षा वेगळे मानले जातात. त्यामुळे मिळालेल्या सुट्टीचं कसं सोनं करायचं, यासाठी भावी इंजिनीअर्सचा बॅकअप प्लॅन रेडी आहे. पार्टीज, ट्रेक, ट्रिपस्, नाइट आऊट आणि अगदीच काही नाही तर दिवसभर घरी आईच्या हातचं मस्त पदार्थ खाऊन आरामात झोप काढण्याचा विचार या विद्यार्थ्यांचा पक्का आहे!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज