अ‍ॅपशहर

इमोरझीलची धूम

कला-क्रीडा क्षेत्रासंबंधित ३०पेक्षा विभिन्न स्पर्धा, सहा वेगवेगळे विभाग आणि एकापेक्षा एक भन्नाच इव्हेंट्सचा माहोल एस. एम. शेट्टी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये पाहायला मिळाला. 'इमोरझील' या फेस्टचं निमित्त होतं.

महाराष्ट्र टाइम्स 4 Feb 2020, 9:27 am
प्रथमेश गायकवाड, विल्सन कॉलेज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम imorzil


कला-क्रीडा क्षेत्रासंबंधित ३०पेक्षा विभिन्न स्पर्धा, सहा वेगवेगळे विभाग आणि एकापेक्षा एक भन्नाच इव्हेंट्सचा माहोल एस. एम. शेट्टी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये पाहायला मिळाला. 'इमोरझील' या फेस्टचं निमित्त होतं. या फेस्टचा 'महाराष्ट्र टाइम्स' मीडिया पार्टनर होता.

कला, संधी आणि बरंच काही!

स्पोर्ट्स, फाइन आर्ट्स, इन्फॉर्मल इव्हेंट आणि स्पेशल इव्हेंट्सची मांदियाळी असणाऱ्या 'इमोरझील २०१९' मध्ये धमाल, मस्ती मनोरंजनाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलेलाही व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आलं. ग्रुप डान्स प्रकारात प्रथम क्रमांक पटकावलेल्या संघाला परीक्षकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. तर द्वितीय आणि तृतीय क्रमांकवरील काही निवडक स्पर्धकांचीही परीक्षकांनी त्यांच्या नव्या डान्स व्हिडिओसाठी निवड केली. त्याचबरोबर 'ऑक्शन कॉशन', 'बॅटलशिप', 'बेग बोरो कलेक्ट' आणि 'होग' अशा हट के स्पर्धांचा यात समावेश होता.

दिल मांगे इ'मोर'झील

'द टेनफोल्ड्स ऑफ इमोरझील' या कार्यक्रमात कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांनी फेस्टबद्दल सांगितलेल्या अनेक गमतीदार, आणि रंगतदार आठवणींनी वातावरण नॉस्टॅल्जिक झालं होतं. आजी-माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या डान्सनं फेस्टला चार चांद लावले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज