अ‍ॅपशहर

कॉमर्सकडे कल!

मुंबईसह देशभरात मेडिकल आणि इंजिनीअरिंग प्रवेशासाठीच्या सामायिक प्रवेश परीक्षांदरम्यान वाढत असलेला गोंधळ आणि फीवाढीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा या शाखांकडे पाठ फिरवण्याकडे कल वाढत आहे. कौन्सिलिंगदरम्यान ही बाब समोर आली असून, अनेकांनी कॉमर्सला पसंती दर्शवल्याचे स्पष्ट झाले आहे. करिअर कौन्सिलरकडूनही याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

Maharashtra Times 19 May 2017, 4:00 am
प्रवेश परीक्षा गोंधळ, फीवाढीमुळे मेडिकल, इंजिनीअरिंगकडे पाठ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम interest towards commerce
कॉमर्सकडे कल!


sourabh.sharma1@timesgroup.com

@sourabhsMT

मुंबई : मुंबईसह देशभरात मेडिकल आणि इंजिनीअरिंग प्रवेशासाठीच्या सामायिक प्रवेश परीक्षांदरम्यान वाढत असलेला गोंधळ आणि फीवाढीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा या शाखांकडे पाठ फिरवण्याकडे कल वाढत आहे. कौन्सिलिंगदरम्यान ही बाब समोर आली असून, अनेकांनी कॉमर्सला पसंती दर्शवल्याचे स्पष्ट झाले आहे. करिअर कौन्सिलरकडूनही याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

मुंबईसह राज्यातील इंजिनीअरिंग आणि मेडिकल अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षांचा विद्यार्थ्यांवरील बोजा वाढत आहे. राज्यातील मेडिकल अभ्यासक्रमांसाठी यंदा ‘सीईटी’ घेण्यात आली असून, देशपातळीवर ‘नीट’च्या माध्यमातून प्रवेश देण्यात येत आहेत. खासगी मेडिकल कॉलेजांच्या जागांवरही यंदा सीईटीच्या माध्यमातून प्रवेश देण्यात येत आहेत. इंजिनीअरिंग प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येत असली तरी आयआयटी आणि तत्सम प्रवेशासाठी जेईईची परीक्षा घेण्यात येते. दुसरीकडे इंजिनीअरिंगसाठी देशभरातील ‘नीट’च्या धर्तीवर एकसमान सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याचे संकेत काही दिवसांपूर्वी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे देण्यात आले होते. सध्या तरी या परीक्षेचा मुहूर्त लांबणीवर पडला आहे.

काही वर्षांचा इतिहास लक्षात घेता प्रवेश परीक्षेदरम्यान मोठ्या प्रमाणात गोंधळ उडत असल्याने त्याचा फटका विद्यार्थी आणि पालकांना बसत आहे. प्रामुख्याने यामुळे विद्यार्थ्यांवरील दडपण वाढले आहे. त्यामुळे यातून सुटका करण्याच्या दृष्टीकोनातून सध्या पालक आणि विद्यार्थी कॉमर्स आणि इतर व्यवसायभिमुख अभ्यासक्रमांना पसंती दर्शवित आहेत. सामायिक परीक्षा आणि गोंधळ हे काही वर्षांपासून समीकरणच बनले आहे. यातून सुटका करण्यासाठी दरवर्षी न बदलणारी परीक्षा पद्धत अवलंबावी, असा सूर पालकांकडून व्यक्त होत आहे.

...

मेडिकलसाठी परदेशवारी

भारतात मेडिकल प्रवेशासाठी होणारा खर्च पाहता अनेक विद्यार्थी परदेशी शिक्षणास प्राधान्य देत असल्याचे कौन्सिलिंगदरम्यान समोर आले. यात ते खास करून रशियाला पसंती दर्शवित असल्याचे स्पष्ट झाले.

...

दहावी आणि बारावीनंतर कोणत्या शाखांची निवड करावी यासाठी सध्या कौन्सिलिंगसाठी विद्यार्थी मोठ्याप्रमाणात आमच्याकडे येत आहेत. यात अनेक विद्यार्थी आणि पालक परीक्षांच्या गोंधळात अडकू नये म्हणून मेडिकलकडे पाठ फिरवून कॉमर्सचा पर्याय निवडत आहेत.

सुचित्रा सुर्वे, करिअर कौन्सिलर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज