अ‍ॅपशहर

केसीचा रहस्यमय किरण

'आऊट ऑफ द डार्क' अशी आगळीवेगळी थीम आणि त्याला रहस्यमय टच, सोबत अनेक कलाप्रकार, स्पर्धांची रेलचेल आणि धम्माल-मस्ती असा भन्नाट माहोल यंदा चर्चगेटच्या केसी कॉलेजमध्ये रंगणार आहे. नेहमीच स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा 'किरण' फेस्टिव्हल काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा मुंबईतल्या कॉलेजांसह बंगलोर, पुणे, दिल्ली इ. अशा विविध विद्यापीठांनी यंदा 'किरण'मध्ये सहभाग घेतला आहे. त्यामुळे नेहमीच विविध आकर्षक इव्हेंट्स आयोजित करणाऱ्या 'किरण' ला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली आहे. यंदा १४ ते १७ डिसेंबर दरम्यान रंगणाऱ्या या किरण फेस्टचा 'महाराष्ट्र टाइम्स' मीडिया पार्टनर आहे.

Maharashtra Times 11 Dec 2017, 12:46 am
मधुरा वालावलकर, निर्मला निकेतन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kc collges fest kiran
केसीचा रहस्यमय किरण

'आऊट ऑफ द डार्क' अशी आगळीवेगळी थीम आणि त्याला रहस्यमय टच, सोबत अनेक कलाप्रकार, स्पर्धांची रेलचेल आणि धम्माल-मस्ती असा भन्नाट माहोल यंदा चर्चगेटच्या केसी कॉलेजमध्ये रंगणार आहे. नेहमीच स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा 'किरण' फेस्टिव्हल काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा मुंबईतल्या कॉलेजांसह बंगलोर, पुणे, दिल्ली इ. अशा विविध विद्यापीठांनी यंदा 'किरण'मध्ये सहभाग घेतला आहे. त्यामुळे नेहमीच विविध आकर्षक इव्हेंट्स आयोजित करणाऱ्या 'किरण' ला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली आहे. यंदा १४ ते १७ डिसेंबर दरम्यान रंगणाऱ्या या किरण फेस्टचा 'महाराष्ट्र टाइम्स' मीडिया पार्टनर आहे.
'नाट्य', 'संगीत', 'नृत्य', 'फॅशन शो', 'ऑनलाईन गेमिंग', 'स्पोर्ट्स', 'फोटोग्राफी', 'फाइन आर्टस्', 'लिटरर आर्टस्' अशा अनेक कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या या फेस्टिव्हलचे सर्व एलिमिनेशन्स १४ तारखेला पार पडेल. तर १५ ते १७ या तीन दिवसात फेस्टिव्हलमधल्या इतर इव्हेंट्सची धूम पाहायला मिळणार आहे. नृत्य, संगीत इत्यादी इव्हेंट्स सोबतच यंदाचं आकर्षण असणारं 'मर्डर ऑन द स्ट्रीट' आणि 'अकॅपेला' हे इव्हेंट्स पहिल्या दिवशी होणार आहेत. ऑनलाइन विश्वातील वेड लावणारे गेम्स आणि टेबल टेनिस, कॅरम, थ्रो बॉल अशा खेळांच्या स्पर्धा देखील केसीच्या कॅम्पसमध्ये 'किरण'च्या निमित्ताने रंगणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज